महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था अमृतच्या वतीने मालेगाव येथे सुरू असलेल्या उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत विभागीय व्यवस्थापक श्री. प्रवीणजी कोळेश्वर यांनी EDP प्रशिक्षणार्थी श्री. केदार पिंपरकर यांच्या बेकरी उद्योगास भेट दिली. यावेळी बेकरीमध्ये तयार होणाऱ्या विविध उत्पादनांची माहिती घेऊन उद्योगाच्या कार्यपद्धतीची पाहणी करण्यात आली. या वेळी जिल्हा उपव्यवस्थापक श्री. रोहितजी देशमुख व अमृत मित्र श्री. नंदकिशोर वनस्कर उपस्थित होते.
मालेगाव येथे अमृतच्या विभागीय व्यवस्थापकांची उद्योजकाच्या बेकरी उद्योगास भेट उद्योजकता विकास प्रशिक्षण (EDP) प्रशिक्षणार्थी केदार पिंपरकर यांच्या उद्योगाची पाहणी; उत्पादनांची व कार्यपद्धतीची घेतली माहिती मालेगाव, जि. वाशीम : महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने मालेगाव येथे सुरू असलेल्या उद्योजकता विकास प्रशिक्षण (EDP) कार्यक्रमांतर्गत क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले. या क्षेत्रभेटीदरम्यान अमृतचे विभागीय व्यवस्थापक श्री. प्रवीणजी कोळेश्वर यांनी EDP प्रशिक्षणाचे लाभार्थी श्री. केदार पिंपरकर यांच्या बेकरी उद्योगास भेट देऊन उद्योगाची पाहणी केली. यावेळी बेकरीमध्ये तयार करण्यात येणाऱ्या विविध बेकरी उत्पादनांची माहिती घेण्यात आली. तसेच उत्पादन प्रक्रिया, उद्योगाची दैनंदिन कार्यपद्धती आणि व्यवसायाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या उद्योजकीय संधी यांविषयी जाणून घेण्यात आले. प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष व्यवसायात उपयोग करून उद्योजकतेच्या क्षेत्रात प्रगती साधणाऱ्या प्रशिक्षणार्थींच्या उद्योगांना अशा क्षेत्रभेटींमुळे प्रोत्साहन मिळते. अमृतच्या उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्देश युवकांमध्ये उद्योजकीय दृष्टिकोन विकसित करणे, स्वयंरोजगारासाठी प्रेरित करणे आणि त्यांना उद्योग-व्यवसायाच्या संधींची प्रत्यक्ष माहिती उपलब्ध करून देणे हा आहे. या अनुषंगाने आयोजित क्षेत्रभेटी प्रशिक्षणार्थींसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरत आहेत. या क्षेत्रभेटीदरम्यान श्री. रोहितजी देशमुख, जिल्हा उपव्यवस्थापक आणि श्री. नंदकिशोर वनस्कर, अमृत मित्र उपस्थित होते.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment