खांदेरी दुर्ग ऐतिहासिक विजय दिन

३१ डिसेंबर १६७९

खांदेरी दुर्ग ऐतिहासिक विजय दिन मुख्य फोटो
मुख्य फोटो

छत्रपती शिवाजी महाराजांची प्रखर बुद्धिमत्ता आणि दुरदृष्टी त्यांच्या प्रत्येक हालचालीत दिसून येते. इंग्रजांमुळे हिंदवी स्वराज्यावर येणारे संकट त्यांनी जाणले होते. इंग्रजांवर वचक ठेवण्यासाठी त्यांनी खांदेरी दुर्गाची निर्मिती केली. खांदेरीवर चालून आलेल्या इंग्रजांच्या बलाढ्य लढाऊ जहाजांचा, स्वराज्याच्या विशिष्ट बनावटीच्या आरमारी गलबतांपुढे टिकाव लागत नव्हता. आपल्या आरमाराने त्यांना सळो की पळो करून सोडले होते. होणारे नुकसान टाळण्यासाठी त्यांनी अखेर तह करण्याचा निर्णय घेतला. तो दिवस होता ३१ डिसेंबर १६७९. तो दिवस खांदेरी दुर्ग ऐतिहासिक विजय दिन म्हणून ओळखला जातो. खांदेरी हा रायगड जिल्ह्यातील एक महत्त्वाचा दुर्ग आहे.

युनेस्कोने जागतिक वारसा यादीमध्ये जे १२ किल्ले समाविष्ट केले आहेत, त्यांमध्ये खांदेरी हा एक जलदुर्ग आहे. दिवाळीच्या काळात अमृत संस्थेमार्फत शिवदुर्गोत्सव साजरा केला होता. त्यात अनेक जिल्ह्यांतील खूप जणांनी खांदेरीची प्रतिकृती केली होती....

Publisher: Shailesh Marathe News publisher name | Date: 31-12-2025 News publication date | Time: 09:04 AM News publication time | Views: 70 Number of times this news has been viewed | District: raigad Related district of the news
Publisher: Shailesh Marathe News publisher name | Date: 31-12-2025 News publication date | Time: 09:04 AM News publication time | Views: 70 Number of times this news has been viewed | District: raigad Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words