श्री समर्थांची शिवथरघळ एक निसर्गसंपन्न स्थळ

समर्थ रामदास यांनी साताऱ्याच्या सज्जनगडावर महासमाधी घेतली, ते पवित्र स्थळ आता एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून उदयास येत आहे.

श्री समर्थांची शिवथरघळ एक निसर्गसंपन्न स्थळ मुख्य फोटो
श्री समर्थांची शिवथरघळ एक निसर्गसंपन्न स्थळ अतिरिक्त फोटो

शिवथरघळ हे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील निसारगसुंदर पर्यटनस्थळ आहे. महाडपासून सुमारे तीस किमी अंतरावर निसारघाचा सानिध्यात वसलेले आहे. या घळी च्या सर्व बाजूंनी उंच पर्वत रांगा असून वाघजाई दरीच्या कुशीत हे ठिकाण आहे. काळ नदीचा उगम याच परिसरात होत असून, पुढे ही नदी सावित्री नदीला जाऊन मिळते. काळ नदीच्या काठावर कुंभे कसबे, व आंबे अशा तीन शिवथर वस्त्या आहेत.

चहूबाजूंनी वेढलेल्या हिरव्यागार वानराईने झाकून टाकलेल्या डोंगराच्या कुशीत शिवथर घळ आहे. या घळीला समर्थ रामदास स्वामी ’सुंदर मठ’ म्हणत असत.

शिवथरघळ आणि आजुबाजूचा सर्व परिसर चंद्रराव मोऱ्यांच्या जावळीच्या वतनात मोडत असे. जावळीचे मोरे हे विजापूर दरबाराचे वतनदार देशमुख होते. घनदाट जावळीच्या भूप्रदेशामुळे मोरे वरचढ झाले होते.

पुढे १६४८ मध्ये शिवरायांनी हा परिसर आपल्या ताब्यात घेतला. आणि रामदासांच्या आयुष्याच्या उत्तरार्धातील शेवटची ३७ वर्षे (१६४४-१६८१) त्यांनी महाराष्ट्रात समाज प्रबोधन, अकरा मारुती मंदिरांची स्थापना, शिवथरघळीत 'दासबोध' ग्रंथाचे लेखन आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आध्यात्मिक बळ देण्यात व्यतीत केली; शेवटी १३ जानेवारी १६८१ रोजी साताऱ्याच्या सज्जनगडावर त्यांनी महासमाधी घेतली..

छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांची भेट हा महाराष्ट्राच्या इतिहासातील आध्यात्मिक आणि राष्ट्रीय प्रेरणेचा एक सुवर्णक्षण मानला जातो. ऐतिहासिक संदर्भानुसार, स्वराज्य निर्मितीच्या काळात (साधारण १६४९ किंवा १६७२ च्या सुमारास) सातारा जवळील शिंगणवाडी किंवा महाडच्या शिवथरघळ येथे या दोन महान विभूतींची पहिली भेट झाली, जिथे समर्थांनी शिवरायांना गुरुमंत्र देऊन आशिर्वाद दिला.

या भेटीदरम्यान महाराजांनी आपले संपूर्ण स्वराज्य समर्थांच्या चरणी अर्पण केले होते, परंतु समर्थांनी त्यांना संन्यासी वृत्तीने केवळ एक 'विश्वस्त' म्हणून प्रजेच्या हितासाठी राज्यकारभार चालवण्याचा सल्ला दिला आणि याच प्रेरणेतून स्वराज्याचा 'भगवा ध्वज' अस्तित्वात आला अशी मान्यता आहे. समर्थांनी दिलेला "मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा" हा संदेश शिवरायांच्या 'हिंदवी स्वराज्य' स्थापनेच्या ध्येयाला पूरक ठरला आणि पुढे महाराजांच्या आग्रहावरूनच समर्थ साताऱ्याच्या सज्जनगडावर वास्तव्यास आले.

सन १६७६ मध्ये दक्षिणदिग्विजयासाठी जातांना श्री समर्थांचा आशीर्वाद येथूनच घेऊनच छत्रपती शिवाजी महाराज पुढे गेले. आजच्या जगाला या घळीचा शोध धुळे येथील विख्यात समर्थभक्त श्री शंकर कृष्ण देव यांनी १९१६ साली लावून दिला.

पायऱ्या चढून आल्यावर समोरच ’शिवथरघळ श्री सुंदरमठ सेवा समिती’ने स्थापन केलेली इमारत लागते. इमारतीहून पुढे गेल्यावर सरळ जाणारा रस्ता थेट घळीपाशी घेऊन जातो. घळीमधे रामदासस्वामींची मूर्ती आहे. घळीच्या समोरच सुंदर धबधबा आहे. तो धीरगंभीर आवाज करीत धरतीवर कोसळत असतो. घळीच्या वरील डोंगरसपाटीवर चंद्रराव मोऱ्यांच्या वाड्याचे अवशेष आहेत.

या सपाटीवरून राजगड, रायगड, तोरणा आणि प्रतापगड सारख्याच अंतरावर आहेत. या पर्यटन स्थळाला नक्की भेट द्या.

कसे पोहोचाल?

रायगड जिल्ह्यातील वरंधा घाटात असलेली शिवथरघळ (सुंदरमठ) महाडपासून ३० किमी, पुण्यापासून सुमारे ९० ते १२० किमी, आणि मुंबईपासून अंदाजे १५० ते २०० किमी अंतरावर आहे. तिथे पोहोचण्यासाठी महाड किंवा वरंधा घाट मार्गाचा वापर करावा लागतो. पायथ्याशी वाहने जातात व पुढे १०० पायऱ्या चढाव्या लागतात.

आजूबाजूची प्रमुख प्रेक्षणीय स्थळे-

वरंधा घाट (Varandha Ghat): प्रचंड हिरवेगार डोंगर, खोल दऱ्या आणि पावसाळ्यात कोसळणारे असंख्य छोटे-मोठे धबधबे यांचे अप्रतिम सौंदर्य येथे पाहायला मिळते.

वाघजाई माता मंदिर: वरंधा घाटाच्या माथ्यावर असलेले हे देवीचे छोटे व प्रसिद्ध मंदिर प्रवाशांचे श्रद्धास्थान आहे.

शिवथरघळीचा सुंदर धबधबा: घळीच्या अगदी शेजारीच उंचावरून पडणारा पांढरेशुभ्र धबधबा पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे.

समर्थ साहित्याशी संबंधित माळ परिसर: जांभळीचा माळ, मठाचा माळ, बोरीचा माळ, उंबराचा माळ व फणशीचा माळ ही समर्थ रामदास स्वामींच्या स्मृती व संचिताशी जोडलेली ऐतिहासिक ठिकाणे आहेत.

काळ नदीचा उगम परिसर: शिवथरघळ परिसरातूनच काळ नदीचा उगम होतो, ज्याचे खोरे अतिशय निसर्गरम्य आहे.

- संकलित


Publisher: Shailesh Marathe News publisher name | Date: 19-08-2026 News publication date | Time: 06:00 AM News publication time | Views: 26 Number of times this news has been viewed | District: Raigad Related district of the news
Publisher: Shailesh Marathe News publisher name | Date: 19-08-2026 News publication date | Time: 06:00 AM News publication time | Views: 26 Number of times this news has been viewed | District: Raigad Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement