स्वरसम्राट मास्टर दीनानाथ मंगेशकर

मराठमोळे गायक, अभिनेते, संगीतकार मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा २९ डिसेंबर हा जन्मदिन. अस्खलित वाणी, अद्वितीय गळा आणि तल्लख बुद्दी अशा अनेक गुणांसाठी दीनानाथ मंगेशकर ओळखले जात. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा अल्प-परिचय करून देणारा हा लेख -

स्वरसम्राट मास्टर दीनानाथ मंगेशकर मुख्य फोटो
मुख्य फोटो

दीनानाथ मंगेशकर यांचा जन्म २९ डिसेंबर १९०० रोजी गोव्यातील मंगेशी येथे झाला. बाबा माशेलकर हे दीनानाथ मंगेशकर यांचे पहिले गुरू होते. १९१४ साली बालगंधर्वांनी गंधर्व नाटक मंडळी नावाची संस्था सुरू केली. त्या वेळी किर्लोस्करांनी गंधर्व नाटक मंडळीची दीनानाथांना ओळख करून दिली आणि या संस्थेमार्फत दीनानाथ रंगभूमीसोबत जोडले गेले. दीनानाथ यांनी १९१५ साली 'ताजेवफा' या हिंदी नाटकाच्या माध्यमातून रंगभूमीवर पदार्पण केलं. या नाट्यसंस्थेत चार वर्षे काम केल्यानंतर त्यांनी १९१८ साली 'बलवंत संगीत मंडळी' नावाच्या नाटक कंपनीची स्थापना केली. नाट्यसंगीताला महाराष्ट्रभरात ओळख मिळवून देण्यात दीनानाथांचे मोठे योगदान आहे.
आपल्या गायनाभिनयाने दीनानाथांनी अनेक भूमिका चांगल्याच गाजवल्या. त्यांना कोल्हटकरांनी 'मास्टर' ही उपाधी बहाल केली आहे. त्यानंतर ते मास्टर दीनानाथ मंगेशकर म्हणून ओळखले जाऊ लागले. दीनानाथ मंगेशकर यांनी मैफली गाजवल्या आहेत. आकाशवाणीवरून त्यांनी रसिकांचं मनोरंजन केलं आहे. सारंगीवादन, कथ्थक नृत्य, संस्कृत साहित्य हे दीनानाथांचे आवडते छंद होते. २४ एप्रिल १९९२ रोजी पुण्यात त्यांचे निधन झाले. मा. दीनानाथ यांची अपत्ये म्हणजे स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, आशा भोसले, मीना खडीकर आणि उषा मंगेशकर. दीनानाथांची ही सर्व मुले आजन्म संगीताची सेवा करत आहेत. अशा या स्वरसम्राटाला शतश: नमन!!

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 29-12-2025 News publication date | Time: 12:16 PM News publication time | Views: 78 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 29-12-2025 News publication date | Time: 12:16 PM News publication time | Views: 78 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words