रायगड जिल्ह्यातील निसर्गाच्या सान्निध्यातील प्राचीन शिव मंदिर- श्रीसिद्धेश्वर मंदीर

हिरव्यागार निसर्गाच्या सान्निध्यात गुळसुंदे नावाचे गाव असून, ते पाताळगंगा नदीच्या पश्चिम तीरावर वसलेले आहे. याच नदीच्या तिरावर पेशव्यांचा सुभेदार रामजी महादेव यांनी श्रीसिद्धेश्वराचे मंदिर बांधले आहे.

रायगड जिल्ह्यातील निसर्गाच्या सान्निध्यातील  प्राचीन शिव मंदिर- श्रीसिद्धेश्वर मंदीर  मुख्य फोटो
रायगड जिल्ह्यातील निसर्गाच्या सान्निध्यातील  प्राचीन शिव मंदिर- श्रीसिद्धेश्वर मंदीर  अतिरिक्त फोटो

पनवेलच्या दक्षिणेस सोळा कि. मी. अंतरावर हिरव्यागार निसर्गाच्या सान्निध्यात गुळसुंदे नावाचे गाव असून, ते पाताळगंगा नदीच्या पश्चिम तीरावर वसलेले आहे.

याच नदीच्या तिरावर पेशव्यांचा सुभेदार रामजी महादेव यांनी श्रीसिद्धेश्वराचे मंदिर बांधले आहे. मंदिरासमोरच पाताळगंगा नदीकिनारी दीपमाळ नजरेत पडते. हे मंदिर फार प्राचिन असून, ते ७०० ते ८०० वर्षांपूर्वीचे आणि त्याचे बांधकाम दगडी स्वरुपाचे आहे.

या मंदिरात श्रीशंकराच्या लिंगासह, पार्वती आणि विविध देवदेवतांच्या मूर्ती आहेत. या प्राचिन मंदिराला भेट देण्यासाठी रायगड जिल्ह्यासह दुरवरून भाविक तेथील देवतांच्या दर्शनासाठी येत असतात. एकीकडे हिरवागार डोंगर आणि दुसरीकडे बारमाही सतत वाहणारी पाताळगंगा नदी. या नदीच्या दुतर्फा असलेली हिरवीगार झाडे पाहता, तेथील निसर्गसौंदर्य प्रत्येकालाच आकर्षित करणारे असते आणि याच पाताळगंगा नदीच्या तिरावरील प्राचिन श्रीसिद्धेश्वराच्या मंदिरामुळे तेथे येणाऱ्या पर्यटकांसह भाविकांची मने प्रफुल्लित होत असतात.

श्रावणात श्रावणी सोमवारी भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. त्याचबरोबर अभिषेक, हरिनाम सप्ताह, नवरात्रीत नवरात्रौत्सव, महाशिवरात्रीला मोठा उत्सव, श्रीराम नवमीला उत्सव असे विविध कार्यक्रम येथे होत असतात. या कार्यक्रमात स्थानिक ग्रामस्थ मोठ्यासंख्येने सहभागी होत असतात.

मुळचे छप्पर व घुमट दगडी असल्यामुळे अतिशय जड होते. त्याजागी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी नवीन छप्पर बांधले होते. आता पत्र्यांचे छप्पर आहे. जवळजवळ दीडशे वर्षांपूर्वी अशी एक वंदता उठली की, मंदिरातील मूर्तीने सिंहगर्जना केली.

हा चमत्कार पाहण्यासाठी हजारो लोक गुळसुंद्यास आले होते. मंदिराच्या बाजूस विश्रामधाम असून, तेथे “महादेव सुत बाजी करमरकर यांनी सिद्धेश्वराच्या पायाशी अर्पण केले” असा मजकूर असलेला शिलालेख आहे. जवळच आनंद काशिनाथ जोशी यांनी १८६७ मध्ये लाकूड, विटांनी बांधलेले लक्ष्मी-नारायणाचे मंदिरही आहे.

- संकलित

Publisher: Shailesh Marathe News publisher name | Date: 17-08-2026 News publication date | Time: 05:35 PM News publication time | Views: 92 Number of times this news has been viewed | District: Raigad Related district of the news
Publisher: Shailesh Marathe News publisher name | Date: 17-08-2026 News publication date | Time: 05:35 PM News publication time | Views: 92 Number of times this news has been viewed | District: Raigad Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement