रोह्यातील सारस्वत परिवाराच्या मेळाव्यात अमृत संस्थेच्या योजनांचा जागर

योजनांचा लाभ घेण्याबद्दल व्यक्त झाली उत्सुकता

रोह्यातील सारस्वत परिवाराच्या मेळाव्यात अमृत संस्थेच्या योजनांचा जागर मुख्य फोटो
रोह्यातील सारस्वत परिवाराच्या मेळाव्यात अमृत संस्थेच्या योजनांचा जागर अतिरिक्त फोटो

रोहा (जि. रायगड) : येथील सारस्वत परिवार मंडळाचा वर्धापनदिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक शैलेश मराठे यांना अमृत संस्थेच्या योजनांच्या संदर्भात माहिती देण्यासाठी विशेष निमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाला सुमारे ८० सदस्य उपस्थित होते.

या वेळी शैलेश मराठे यांनी अतिशय प्रभावी पद्धतीने उपस्थितांना मार्गदर्शन केले. खुल्या प्रवर्गासाठी, तसेच विशेषतः ब्राह्मण समाजासाठी असलेल्या शासनाच्या विविध योजना, उद्योग व व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रक्रिया, कागदपत्रे आणि संधी यांची सविस्तर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थितांना शासकीय योजनांचा लाभ कसा घेता येईल, याबाबत स्पष्ट दिशा मिळाली. उपस्थितांनी त्यांच्या कार्याचे मनापासून कौतुक केले.

मराठे यांनी दिलेला बहुमूल्य वेळ आणि मार्गदर्शनासाठी प्रवीण वागळे यांनी त्यांचे आभार मानले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहोचावी आणि त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळावा, हाच या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले. हा मेळावा माहितीपूर्ण व प्रेरणादायी ठरला असून, उपस्थित सदस्यांनी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in

Publisher: Shailesh Marathe News publisher name | Date: 14-12-2025 News publication date | Time: 05:43 PM News publication time | Views: 67 Number of times this news has been viewed | District: raigad Related district of the news
Publisher: Shailesh Marathe News publisher name | Date: 14-12-2025 News publication date | Time: 05:43 PM News publication time | Views: 67 Number of times this news has been viewed | District: raigad Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words