महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेद्वारा जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात ई डी पी बॅच चे उद्घाटन जळगाव जिल्हा प्रचार विभागाचे प्रमुख मंदार पाठक व लक्षित समाजाचे प्रमुख घटक या सर्वांच्या व लाभार्थ्यांच्या साक्षीने ई डी पी च्या वर्गाचे शानदार उद्घाटन आज 24 जुलै 2026 रोजी संपन्न झाले.
अमृत या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेद्वारा जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील शहरात दिनांक 24 जुलै 2026 रोजी इंटरप्रीनरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम ईडीपी चा कार्यक्रम लक्षित समाजाच्या आर्थिक दुर्बल घटकातील खुल्या वर्गातील प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग संस्था महामंडळामार्फत संस्थांसाठी त्यांच्या आर्थिक उत्थानासाठी महाराष्ट्र शासनाचे हे एक पहिले पाऊल महाराष्ट्रात 36 जिल्ह्यांमध्ये गतिमान होत असताना दिसत आहे या या आर्थिक दुर्बल घटकांमध्ये येणाऱ्या जाती समाजांमध्ये प्रामुख्याने सिंधी ,मारवाडी राजपुरोहित, ब्राह्मण, कामा,कायस्थ, अय्यंगार ,नायर ,नायडू ,पाटीदार ,बंगाली ,पटेल ,यलमार ,त्यागी सेनगुंथर, भूमिहार, गुजराती, जाट ,बनिया, राजपूत कोमटी ,नेपाळी हिंदू ,लोहाना इत्यादी.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी लक्षित समाजाचे श्री मंदार पाठक, (जिल्हा प्रचार प्रमुख रा.स्व. संघ) हिरा शेठ बजाज (सिंधी समाज प्रमुख)गोपाल अग्रवाल अग्रवाल समाज प्रमुख व ,मोहनसिंग पवार करणी सेना उत्तर महाराष्ट्र मार्गदर्शक राजपूत समाज या सर्वांच्या प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले, प्रथमतः भारत मातीच्या प्रतिमेला सर्वांच्या हस्ते पुष्प अर्पण अर्पण अर्पण करण्यात आले तसेच यावेळी पाहुण्यांचा स्वागत वारी हा अंक देऊन करण्यात आले.
यावेळी सर्व समाजाच्या प्रतिनिधींनी लक्ष समाजाच्या प्रशिक्षणार्थींना उदभोतीत केले की ,सर्वांनी प्रशिक्षण पूर्ण करून व स्वतःचा व्यवसाय सुरू करावा व अमृतच्या योजनांचा जास्तीत जास्त फायदा घेऊन आपले स्वतःचे आर्थिक उत्पन्न वाढवून देशाच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करावी असे मान्यवरांनी आपल्या दोन शब्दात मार्गदर्शन केले.
अग्रवाल समाजाचे श्री गोपाल शेठ अग्रवाल म्हणाले की आपण चिकाटीने जर व्यवसाय केला तर जरूर यश येते आपल्याला व्यवसाय करत असताना नफा नुकसान सहन करण्याची सहनशीलता व्यापारी या दृष्टीने असावी व व्यापार करत असताना तोंडात साखर व डोक्यावर बर्फ ठेवून व्यवसाय जर केला तर कोणतेही काम कोणताही व्यवसाय कठीण नाही.
राजपूत समाजाचे श्री मोहन सिंग पवार म्हणाले की मराठी माणसाने जरूर व्यवसाय करावा व आर्थिक उत्पन्न वाढीसाठी जो अमृतचे नियोजन सुरू आहे त्यात त्यांनी सहभागी होऊन स्वतःच्या हिमतीने कर्ज मिळवून वैयक्तिक व्याज परताव्याचा लाभ घेऊन नोकरी मागणारे न होता नोकरी देणारे व्हा !असे त्यांनी उदभदित केले व अल्पसंख्यांक समाजाचा त्यांनी फळ विक्रीचा अनुभव सांगून आपणही अमृतच्या फळ विक्री योजना चा लाभ घ्यावा व जिल्ह्याचे व्यवस्थापक व त्यांचे सहकारी यांच्याशी संपर्कात राहून आपण व आपल्या इतर मित्रांनाही अमृत योजनेचे , प्रशिक्षणाचे फायदे घेण्यासाठी उद्युक्त करा.
मंदार पाठक यांनी आपल्या कन्सल्टिंग व्यवसायात जर कोणी लक्ष समाजाचे जर आले तर त्यांना आर्थिक नियोजनाबाबत मदत करु असे आश्वासीत केले
तसेच आजच्या या कार्यक्रमाच्या सत्रात बँकेविषयी जळगाव जनता सहकारी बँकेचे चाळीसगाव शाखेचे लोन इन्चार्ज श्री गिरीश टाकणे यांनी बँकेसंदर्भात कागदपत्र संदर्भात लाभार्थ्यांना येणाऱ्या भविष्यातील अडचणी , आमच्या जळगाव जनता सहकारी बँकेमार्फतही अमृतच्या व्याज परताव्याचा योजनांचा आम्ही लाभार्थ्यांना लाभ दिलेला आहे असेही त्यांनी सांगितले व विशेष मार्गदर्शनही केले
आभार प्रदर्शन अमृत चे जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र कानडे यांनी केले , या कार्यक्रमासाठी अमृत मित्र विनोद देशपांडे व लक्षित समाजाच्या काही विशेष मंडळींनी केले.
कार्यक्रमाचा समारोप चहापणाने करण्यात आला..
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment