छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत विशेष प्रशासकीय मेळावा
महत्त्वाची सूचना व निमंत्रण **छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत विशेष प्रशासकीय मेळावा** महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच स्व. उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त उपविभागीय अधिकारी तथा तालुका दंडाधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत प्रशासकीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात 'अमृत'संस्थेला विशेष निमंत्रित करण्यात आले आहे. या मेळाव्यात **'अमृत उद्योग कौशल्यवर्धन प्रशिक्षण' (EDP) यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात येणार आहे.
तरी 'अमृत' संस्थेकडून EDP प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व प्रशिक्षणार्थींनी या मेळाव्यास आवर्जून उपस्थित राहून सहकार्य करावे, ही नम्र विनंती. कार्यक्रम तपशील: दिनांक: २२ जुलै २०२६ वेळ: (वेळ सकाळी १० वाजता) स्थळ: ओम गार्डन, नागार्जुन स्कूलसमोर, यशोसाई हॉस्पिटलच्या बाजूला, कौठा, नांदेड.
निमंत्रक: अमृत कार्यालय, नांदेड
संपर्क: ७३९१०६५४७२
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment