जागतिक एकल महिला दिनानिमित्त स्त्रीशक्तीचा जागर

जागतिक एकल महिला दिनानिमित्त पंचायत समिती शिरूर व ग्रामपंचायत शिक्रापूर यांच्या माध्यमातून मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

जागतिक एकल महिला दिनानिमित्त स्त्रीशक्तीचा जागर  मुख्य फोटो
मुख्य फोटो

जागतिक एकल महिला दिनानिमित्त शिक्रापूर येथे महिला मेळावा उत्साहात संपन्न


जागतिक एकल महिला दिनानिमित्त आज शिक्रापूर येथे पंचायत समिती शिरूर व शिक्रापूर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने एकल महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यास ग्रामपंचायतीचे कर्मचारी, सरपंच तसेच अमृत संस्थेचे प्रतिनिधी कमलाकर कुलकर्णी उपस्थित होते.


कार्यक्रमामध्ये एकल महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, हक्क व सवलतींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सरपंच श्री. रमेश गडदे व शिंदे भाऊसाहेब यांनी महिलांना योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रासंदर्भात आणि विविध दाखले मिळवताना येणाऱ्या अडचणींबाबत मार्गदर्शन केले.


यावेळी अमृत संस्थेच्या वतीने कमलाकर कुलकर्णी यांनी अमृत संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देत महिलांना त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.


मेळाव्यात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विविध योजनांबाबत प्रश्न विचारले व मार्गदर्शन घेतले. उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे सांगितले.


या कार्यक्रमामुळे एकल महिलांमध्ये शासकीय व सामाजिक योजनांविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली असून, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हा मेळावा उपयुक्त ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/


Publisher: कमलाकर कुलकर्णी News publisher name | Date: 23-06-2026 News publication date | Time: 07:58 PM News publication time | Views: 107 Number of times this news has been viewed | District: Pune Related district of the news
Publisher: कमलाकर कुलकर्णी News publisher name | Date: 23-06-2026 News publication date | Time: 07:58 PM News publication time | Views: 107 Number of times this news has been viewed | District: Pune Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement