शिक्रापूर येथे विश्व युवा कौशल्य दिनानिमित्त ज्ञानदीप ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला सदिच्छा भेट देण्यात आली. यावेळी संस्थेचे प्रमुख श्री. रविकिरण लांडे यांची भेट घेऊन त्यांना विश्व युवा कौशल्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
शिक्रापूर येथे विश्व युवा कौशल्य दिनानिमित्त ज्ञानदीप ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला भेट
शिक्रापूर येथे विश्व युवा कौशल्य दिनानिमित्त ज्ञानदीप ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला सदिच्छा भेट देण्यात आली. यावेळी संस्थेचे प्रमुख श्री. रविकिरण लांडे यांची भेट घेऊन त्यांना विश्व युवा कौशल्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
त्यानंतर इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे महत्त्व, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी तसेच आधुनिक काळातील विविध कौशल्यांचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी अमृत संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकास उपक्रमांची व योजनांची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. विद्यार्थ्यांनीही या उपक्रमांविषयी उत्सुकता दर्शवत विविध प्रश्न विचारले व मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
विश्व युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने आयोजित या भेटीमुळे विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाच्या विविध संधींबाबत उपयुक्त माहिती मिळाली.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment