कादंबरीकार नारायण हरी आपटे

आज नारायण हरि आपटे यांची जयंती आहे. त्यानिमित्त त्यांच्या साहित्य प्रवासाची ही माहिती.

 कादंबरीकार  नारायण हरी आपटे  मुख्य फोटो
मुख्य फोटो

नारायण हरि आपटे यांनी मुख्यत: कादंबऱ्या लिहिल्या असल्या, तरी त्यांच्या लघुकथासंग्रह आणि वैचारिक लेखनही प्रकाशित झाले आहे . त्यांनी जवळपास पस्तीस कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांतल्या थोड्याशा ऐतिहासिक सोडल्या तर बाकीच्या सामाजिक कादंबऱ्या आहेत.‘किर्लोस्कर खबर’ या नियतकालिकाचे ते सहसंपादक होते.

कोरेगावहून त्यांचे स्वत:चे ‘मधुकर’ नावाचे मासिक प्रसिद्ध होत असे. प्रभातने नारायण हरी आपटे यांच्या ‘भाग्यश्री’ कादंबरीवर प्रभातने ‘अमृतमंथन’ (१९३४) ‘रजपूत रमणी’ कादंबरीवर प्रभातने ‘रजपूत रमणी’ (१९३६) ‘भाग्यरेखा’ हा चित्रपट ना.ह.आपट्यांच्या ‘पाच ते पाच’ या कथेवरून चित्रपट तयार केले. कुंकू हा प्रभात चित्रपटसंस्थेचा चा गाजलेला चित्रपट, ना.ह.आपटे यांच्या ‘न पटणारी गोष्ट’ या कादंबरीवर आधारित आहे. ट्रेलरची पद्धत कुंकु चित्रपटापासुन सुरु झाली. ट्रेलरमुळे सिनेप्रेक्षकांची उत्सुकता कमालीची ताणली गेली होती.‘अमृतमंथन’ (१९३४) चित्रपटात सुविद्य नटी नलिनी तर्खडने यात राणी मोहिनीची भूमिका केली. चित्रपटाच्या शेवटी तत्त्वासाठी अंध झालेला राजगुरू देवीसमोर स्वहस्ते आपले शिर कापून अर्पण करतो असा क्लायमॅक्स आहे. हिंदीमध्ये राजगुरूची ही आव्हानात्मक अवघड भूमिका भेदक आणि पाणीदार डोळ्याच्या चंद्रमोहनने केली होती. सुमित्राच्या भूमिकेतील शांता आपटेची गाणी संपूर्ण हिन्दुस्थानात लोकप्रिय झाली होती. ‘अमृतमंथन’ची हिंदी आवृत्ती कृष्णमध्ये एकोणतीस आठवडे चालली. त्या काळी चित्रपटांचे रौप्य महोत्सव इतक्या सहजासहजी होत नसत. नारायण हरी आपटे यांचे लेखन न पटणारी गोष्ट (१९२३), सुखाचा मूलमंत्र (१९२४), पहाटेपूर्वींचा काळोख (१९२६), उमज पडेल तर (१९३९), एकटी (१९४५) या त्यांच्या काही प्रसिद्ध सामाजिक कादंबऱ्या होत. त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्यापैकी अजिंक्यतारा (१९०९), संधिकाल (१९२२), लांच्छित चंद्रमा (१९२५) आणि रजपूतांचा भीष्म (१९४९) या विशेष उल्लेखनीय आहेत. आराम-विराम (१९३४) आणिबनारसी बोरे हे त्यांचे कथासंग्रह. यांशिवाय गृहसौख्य (१९३१), आयुष्याचा पाया (१९४६), कुर्यात् सदा मङ्गालम् (१९४९) * नारायण हरि आपटे* यांचे १४ नोव्हेंबर १९७१ रोजी निधन झाले. *नारायण हरि आपटे* यांना आदरांजली.

-संकलित

Publisher: Shailesh Marathe News publisher name | Date: 11-07-2026 News publication date | Time: 11:22 AM News publication time | Views: 107 Number of times this news has been viewed | District: Raigad Related district of the news
Publisher: Shailesh Marathe News publisher name | Date: 11-07-2026 News publication date | Time: 11:22 AM News publication time | Views: 107 Number of times this news has been viewed | District: Raigad Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement