बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात ज्येष्ठ नागरिकांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी शासनाने उचलले आहे एक महत्त्वाचे पाऊल !

'शतायु' (SHATAYU) हा केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाद्वारे २२ मे २०२६ रोजी सुरू करण्यात आलेला एक डिजिटल डॅशबोर्ड आहे.

बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात ज्येष्ठ नागरिकांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी शासनाने उचलले आहे एक महत्त्वाचे पाऊल ! मुख्य फोटो
मुख्य फोटो

'शतायु' (SHATAYU) हा केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाद्वारे २२ मे २०२६ रोजी सुरू करण्यात आलेला एक डिजिटल डॅशबोर्ड आहे. याचा मुख्य उद्देश भारतातील ज्येष्ठ नागरिकांना मदत करणे आणि त्यांच्यासाठी प्रशिक्षित काळजीवाहूंची (Geriatric Caregivers) उपलब्धता राज्य आणि जिल्हा स्तरावर शोधणे हा आहे.
'शतायु' (SHATAYU - Senior Holistic Care Assistance and Training For Your Utility) डॅशबोर्डबद्दल महत्त्वाची माहिती:
• उद्दिष्ट: ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन आरोग्याची काळजी, सहाय्य आणि व्यावसायिक सेवा मिळवून देणे.
• नोंदणी: या प्लॅटफॉर्मवर प्रशिक्षित केअरगिव्हर्स (Caregivers) स्वतःची नोंदणी करू शकतात, जेणेकरून गरजू ज्येष्ठ नागरिक किंवा त्यांचे कुटुंबीय त्यांच्या सेवांचा लाभ घेऊ शकतील.
• व्यवस्थापन: या डॅशबोर्डचे व्यवस्थापन 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल डिफेन्स' (NISD) द्वारे केले जाते.
• वैशिष्ट्ये: यामध्ये वापरकर्त्यासाठी अतिशय सोपे फीचर्स आणि युजर-फ्रेंडली इंटरफेस देण्यात आला आहे.
JEEVAN (जीवन) ॲप: या डॅशबोर्डसोबतच वरिष्ठ नागरिकांसाठी 'JEEVAN' नावाचे मोबाईल ॲप देखील लॉन्च करण्यात आले आहे. या ॲपद्वारे सरकारी योजना, आपत्कालीन मदत आणि ज्येष्ठ नागरिकांच्या निवारा केंद्रांची माहिती एकाच छताखाली मिळणार आहे.
वृद्धांना हाताळण्यास अत्यंत सोपे-
युझर फ्रेंडली डिझाईन- तांत्रिक ज्ञान नसलेले वृद्धही हे ॲप सहज वापरू शकतील.यासाठी मोठा फॉन्ट साईझ,सोपे आयकॉन्स आणि व्होईस कमांड (आवाजाने सूचना) सुविधा दिली जाईल.

एकाच ठिकाणी सर्व माहिती-
योजनांचा लाभ- वयस्कर नागरिकांसाठी असलेल्या केंद्र आणि राज्य सरकारच्या पेन्शन योजना,आरोग्य विमा आणि इतर कल्याणकारी योजनांची माहिती येथे उपलब्ध असेल.
थेट अर्ज-
पात्र ज्येष्ठ नागरिक या ॲपच्या माध्यमातून विविध योजनांसाठी थेट अर्ज करू शकतील.

आरोग्याची काळजी-
हे ॲप ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘आरोग्य साथीदार’ म्हणून काम करतील. यात औषधे घेण्याची वेळ,डॉक्टरांची भेट यांचे रीमाइंडर सेट करता येतील.

सरकारी वृद्धाश्रमांची माहिती-
ज्या वृद्धांना दुर्दैवाने निवासाची किंवा हक्काच्या आधारासाठी कोणी नाही,त्यांच्यासाठी देशभरातील सरकारी आणि अनुदानित वृद्धाश्रमांची यादी फोन नंबरसह उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्या वृद्धाश्रमांमध्ये उपलब्ध जागा आणि सुविधा यांची माहितीही याद्वारे मिळणार आहे.

आणीबाणीच्या वेळी मिळणार तात्काळ मदत-
वैद्यकीय आणीबाणी किंवा इतर कोणत्याही संकटाच्या वेळी या ॲपमधील ‘इमर्जन्सी’ बटणाद्वारे तात्काळ मदत मिळवता येते. हे बटण दाबताच जवळचे पोलिस स्टेशन,रुग्णालय,नातेवाईक यांना आपातकालीन संदेश व लोकेशन पाठवले जाईल.

असे करता येईल डाऊनलोड-
हे ॲप पूर्णपणे मोफत असून अँड्रॉइड युजर्ससाठी ‘गुगल प्ले स्टोअर’ आणि आयफोन युजर्ससाठी ‘ॲप स्टोअर’ वर उपलब्ध आहे. स्टोअरमधून ‘जीवन’ ॲप डाऊनलोड करून,मोबाईल नंबर आणि प्राथमिक माहिती भरून ज्येष्ठ नागरिक किंवा नातेवाईक यावर सोप्या पद्धतीने नोंदणी करू शकता.

- संदर्भ- socialjustice.gov वेबसाईट व इतर संकलित माहिती

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 10-07-2026 News publication date | Time: 02:46 PM News publication time | Views: 68 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 10-07-2026 News publication date | Time: 02:46 PM News publication time | Views: 68 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement