महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे यांच्या वतीने राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील अमृतच्या लक्षित गटातील युवक-युवतींसाठी सन २०२६-२७ या वर्षाकरिता विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पात्र उमेदवारांना नामांकित व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांमार्फत पूर्व प्रशिक्षणासह विद्यावेतन, आकस्मिक खर्च आणि प्रशिक्षण शुल्कासाठी शासकीय आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.
८०० उमेदवारांची निवड
या योजनेंतर्गत एकूण ८०० उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. UPSC नागरी सेवा, MPSC राज्यसेवा, संयुक्त गट-ब, संयुक्त गट-क, अभियांत्रिकी सेवा, न्यायिक सेवा, SSC, बँकिंग, TET तसेच पोलीस व मिलिटरी भरती यांसारख्या विविध स्पर्धा परीक्षांसाठी पूर्व प्रशिक्षण दिले जाणार आहे.
परीक्षानिहाय उपलब्ध जागा
- UPSC नागरी सेवा परीक्षा (दिल्ली) – ३० जागा
- UPSC नागरी सेवा परीक्षा (महाराष्ट्र) – ३० जागा
- MPSC राज्यसेवा – १७५ जागा
- MPSC अभियांत्रिकी सेवा – २५ जागा
- MPSC न्यायिक सेवा – २५ जागा
- MPSC संयुक्त गट-ब – १७५ जागा
- MPSC संयुक्त गट-क – १७५ जागा
- SSC – २५ जागा
- बँकिंग परीक्षा – ७० जागा
- पोलीस व मिलिटरी भरती – २० जागा
- TET – ५० जागा
एकूण – ८०० जागा
विद्यावेतन व प्रशिक्षण शुल्कासाठी आर्थिक सहाय्य-
प्रशिक्षणाच्या प्रकारानुसार पात्र लाभार्थ्यांना दरमहा ६ हजार ते १३ हजार रुपये विद्यावेतन, १० हजार ते १८ हजार रुपये आकस्मिक खर्च तसेच ४० हजार ते २ लाख रुपयांपर्यंत प्रशिक्षण शुल्कासाठी शासकीय आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.
UPSC दिल्ली प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या उमेदवारांना १० हजार रुपये प्रवास भत्ता देण्यात येणार आहे. विद्यावेतनाचा लाभ घेण्यासाठी संबंधित प्रशिक्षणामध्ये किमान ७५ टक्के उपस्थिती आवश्यक राहणार आहे.
अमृतच्या लक्षित गटातील युवक-युवतींना संधी-
या योजनेसाठी अमृतच्या लक्षित गटातील पात्र घटकांमधील उमेदवार अर्ज करू शकतात. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असणे आवश्यक असून, तो खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षित गटातील असावा.
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. संबंधित स्पर्धा परीक्षा देण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. तसेच यापूर्वी कोणत्याही शासकीय अथवा निमशासकीय संस्थेकडून संबंधित प्रशिक्षणाचा लाभ घेतलेला नसावा.
CETद्वारे गुणवत्तेनुसार निवड
प्रशिक्षणासाठी उमेदवारांची निवड सामायिक प्रवेश परीक्षा (Common Entrance Test - CET) मधील गुणवत्तेनुसार करण्यात येणार आहे.
एकूण जागांपैकी ३० टक्के जागा महिलांसाठी, ५ टक्के जागा दिव्यांगांसाठी आणि १ टक्का जागा अनाथ उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. आरक्षित प्रवर्गातील जागा रिक्त राहिल्यास त्या नियमानुसार सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत.
एका लाभार्थ्यास एका आर्थिक वर्षात एकाच प्रशिक्षणाचा लाभ घेता येणार असून, आयुष्यात जास्तीत जास्त दोन वेळा प्रशिक्षणाचा लाभ घेता येणार आहे.
२३ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज
या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ९ ऑगस्ट २०२६ पासून सुरू झाली असून २३ ऑगस्ट २०२६ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज करावा.
ऑनलाइन अर्ज लिंक :
"AMRUT CET 2026 ऑनलाइन अर्ज" (https://reference-url-citation.invalid/1)
तसेच महाअमृतच्या अधिकृत संकेतस्थळाच्या मुख्य पृष्ठावरही अर्जाची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तांत्रिक अडचणीसाठी हेल्पडेस्क
अर्ज भरताना तांत्रिक अडचण अथवा Error आल्यास संबंधित Error चा Screenshot सोबत घेऊन पुढील माध्यमांवर संपर्क साधता येईल.
ई-मेल : amrutcet2026helpdesk@gmail.com
हेल्पलाईन : 022-65475009
हेल्पलाईनची वेळ : सोमवार ते शनिवार, सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत.
अमरावती जिल्हा कार्यालयाशी संपर्क
अमरावती जिल्ह्यातील पात्र उमेदवारांना अधिक माहितीसाठी अमृत अमरावती जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधता येईल.
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)
अमरावती जिल्हा कार्यालय
आशीर्वाद इमारत, टोपे नगर, गृहनिर्माण भवन जवळ,
मालटेकडी रोड, मालटेकडी, अमरावती, महाराष्ट्र – ४४४६०२
दूरध्वनी : +९१ ९११२२ २७६३५
स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून शासकीय सेवेत करिअर करण्याची तयारी करणाऱ्या पात्र युवक-युवतींसाठी ही महत्त्वपूर्ण संधी असून, अमरावती जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी २३ ऑगस्ट २०२६ पूर्वी ऑनलाइन अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृतच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments 1 Comments
Kumari Gulabsha Rahim Shaikh
I belong to the Open EWS(Muslim)category.I kindly request that I be allowed to benefit from this scheme.In the application form,there is an option for Open EWS,but the sub-category option for 'Muslim' is missing.I earnestly request you to look into this matter and help resolve this issue so I can apply.
Write a Comment