रामचंद्र काशीनाथ म्हाळगी अर्थात रामभाऊ म्हाळगी जयंती

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, जनसंघ या राजकीय पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले सरचिटणीस आणि विधानसभेतील पहिले आमदार रामचंद्र काशीनाथ म्हाळगी उर्फ रामभाऊ म्हाळगी यांची आज जयंती,त्यानिमित्त त्यांच्या राजकीय आणि समाजिक जीवनाचा हा आढावा.

रामचंद्र काशीनाथ म्हाळगी अर्थात रामभाऊ म्हाळगी जयंती  मुख्य फोटो
मुख्य फोटो

रामभाऊ म्हाळगी यांचा जन्म ९ जुलै १९२१ रोजी पुणे येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. शाळेत स्थानिक भाषेच्या अंतिम परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी पुणे येथील सरस्वती मंदिर शाळेत प्रवेश घेतला आणि एका शैक्षणिक वर्षात ३ मानके उत्तीर्ण करून प्रथम मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. सन १९३९ साली रामभाऊ म्हाळगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले. मॅट्रिकनंतर त्यांनी पुढील शिक्षण घेण्याऐवजी, केरळ येथे जाऊन संघ प्रचारक म्हणून काम करण्यास सुरुवात केली.


सन १९४८ मध्ये आरएसएसवर बंदी आली तेव्हा रामभाऊ भूमिगत झाले आणि अन्यायाविरोधात आंदोलन चालू ठेवले. बंदी उठवल्यानंतर ते पुण्यात परतले, तेथे त्यांनी एलएलबी आणि एमए दोन्ही पदव्या संपादित केल्या आणि बार कौन्सिलची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (संघाची विद्यार्थी शाखा) आणि नंतर जनसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आणि महाराष्ट्रातील पक्षाचे कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांना दायित्व सोपवण्यात आले. रामभाऊ म्हाळगी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, जनसंघ या राजकीय पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले सरचिटणीस आणि विधानसभेतील पहिले आमदार, तसेच भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले प्रादेशिक अध्यक्ष होते.


जनता पार्टीचे खासदार म्हणून सन १९७७ साली व १९८० मध्ये ते ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. पूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात प्रथमच जनसंघाची पताका फडकावणारी राम-कृष्ण यांची जोडी होती, जी आणीबाणीमध्ये फुटली (कृष्णराव भेगडे व रामभाऊ म्हाळगी). कृष्णराव भेगडे काँग्रेसमध्ये गेले परंतु रामभाऊ अखेरपर्यंत जनसंघ, जनता पक्ष व शेवटी भाजपात राहिले. त्यांचे साधे राहणीमान व नवीन उपक्रमची शैली यामुळे ते राजकारणात आघाडीवर राहिले. पुण्यातून सातत्याने विधानसभा व नंतर ठाण्यातून लोकसभेवर ते निवडून गेले. अनेक विषयांवर ते मुद्देसूद चर्चा करीत. त्यांच्याइतके प्रश्न आजपर्यंत विधानसभापटलावर कोणीही मांडले नसतील. मतदारांनी निवडून दिल्यामुळे त्यांच्याबद्दल असलेल्या उत्तरदायित्वामुळे त्यांनी आपल्या कामाचा वार्षिक कार्यवृत्त अहवाल देण्याची पद्धत सुरू केली. रामभाऊंची विधानसभेतील तसेच बाहेरील व्यासपीठावरील भाषणे ही अत्यंत अभ्यासू असत; व्यक्तिगत टीका-टिपणी ते कधीही करीत नसत. सर्वच पक्षातील नेत्यांशी त्यांचे मैत्रीचे नाते असे. आमदार तसेच त्यानंतर खासदारपदी निवड झाल्यावर रामभाऊ म्हाळगी यांनी आपल्या काम करण्याच्या शैलीतून विधिमंडळाच्या कामकाजात स्वतःचा वेगळा ठसा उमटवला. मोठमोठ्या प्रश्नांची अगदी सहजपणे उकल करण्याच्या विशिष्ट पद्धतीमुळे ते संसद गाजवत राहिले. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. पुण्यातून ते विधानसभेवर निवडून येत. सन १९७७ च्या जनता लाटेमध्ये ते ठाणे मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले, नंतर सन १९८० मध्येही ते ठाणे येथूनच निवडून गेले होते. त्यांच्या नावाने भाजप तर्फे 'रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी'चे संचालन केले जाते. तसेच त्यांच्या नावाने व्याख्यानेही चालू आहेत. त्यांच्या नावाचे रामभाऊ म्हाळगी प्राथमिक विद्यालयही आहे. रामभाऊ म्हाळगी यांचे ६ मार्च १९८२ रोजी निधन झाले.

-संकलित

Publisher: Shailesh Marathe News publisher name | Date: 09-07-2026 News publication date | Time: 12:03 PM News publication time | Views: 108 Number of times this news has been viewed | District: Raigad Related district of the news
Publisher: Shailesh Marathe News publisher name | Date: 09-07-2026 News publication date | Time: 12:03 PM News publication time | Views: 108 Number of times this news has been viewed | District: Raigad Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement