पं. मदनमोहन मालवीय

२५ डिसेंबर हा पं. मदनमोहन मालवीय यांचा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा अल्प परिचय...

पं. मदनमोहन मालवीय मुख्य फोटो
मुख्य फोटो

पं. मदनमोहन मालवीय हे एक भारतीय विद्वान, शैक्षणिक सुधारक आणि भारतीय राष्ट्रवादी चळवळीचे नेते होते. २५ डिसेंबर १८६१ रोजी त्यांचा जन्म झाला. प्रसिद्ध संस्कृत विद्वान पंडित ब्रिजनाथ यांचे ते पुत्र होते आणि त्यांचे प्रारंभिक शिक्षण दोन संस्कृत पाठशाळांमध्ये (पारंपरिक शाळा) झाले. १८८४मध्ये अलाहाबाद येथील मुईर सेंट्रल कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर त्यांनी स्थानिक शाळेत अध्यापनाचे काम हाती घेतले. ते मेहनती आणि विद्वान होते. परंतु त्यांचा राजकारणाकडे जास्त कल होता. त्यांनी १८८६च्या कलकत्ता (कोलकाता) येथील अधिवेशनात राजकीय पदार्पण केले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते एक कष्टाळू कार्यकर्ते होते.
मालवीय यांनी इंपीरियल लेजिस्लेटिव्ह कौन्सिलवरदेखील (१९०९-२०) काम केले. एक प्रतिभावान वक्ते म्हणून त्यांनी मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण, ब्रिटिश वसाहतींमध्ये भारतीय करारबद्ध कामगारांच्या भरतीवर बंदी आणि रेल्वेचे राष्ट्रीयीकरण यांसारख्या मुद्द्यांवर वादविवादात सक्रिय सहभाग घेतला. काँग्रेसचे कट्टर समर्थक असले, तरी मालवीय यांनी १९०६ मध्ये हिंदू महासभा स्थापन करण्यास मदत केली. त्यामुळे विविध स्थानिक हिंदू राष्ट्रवादी चळवळी एकत्र आल्या.
देशाचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यात रस असलेले मालवीय हे १९१६मध्ये वाराणसीत स्थापन झालेल्या बनारस हिंदू विद्यापीठाचे प्रमुख संस्थापक होते. त्यांनी सुमारे दोन दशके (१९१९-३८) विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम केले आणि त्यांच्या मृत्यूपर्यंत ते सक्रिय राहिले. मालवीय यांनी अभ्युदय हे स्वतःचे हिंदी भाषेतील साप्ताहिक (१९०७), इंग्रजी भाषेतील 'द लीडर ऑफ अलाहाबाद' हे दैनिक (१९०९) आणि 'मर्यादा' हे हिंदी मासिक (१९१०) सुरू केले. याव्यतिरिक्त, ते १९२४पासून अखेरपर्यंत हिंदुस्तान टाइम्सच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष होते. १२ नोव्हेंबर १९४६ रोजी त्यांचे निधन झाले.

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 24-12-2025 News publication date | Time: 07:39 PM News publication time | Views: 80 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 24-12-2025 News publication date | Time: 07:39 PM News publication time | Views: 80 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words