पावसाळ्याच्या आगमनानंतर जागतिक वारसा स्थळ असलेल्या वेरूळ लेण्यांचा परिसर हिरवाईने नटला असून, निसर्ग आणि इतिहासाचा अद्वितीय संगम अनुभवण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येथे भेट देत आहेत.
पावसाळ्याच्या आगमनानंतर जागतिक वारसा स्थळ असलेल्या वेरूळ लेण्यांचा परिसर हिरवाईने नटला असून, निसर्ग आणि इतिहासाचा अद्वितीय संगम अनुभवण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येथे भेट देत आहेत. रिमझिम पाऊस, डोंगररांगांवर पसरलेली हिरवाई आणि लेण्यांच्या परिसरातील प्रसन्न वातावरणामुळे वेरूळ हे पावसाळी पर्यटनाचे आकर्षण ठरत आहे. वेरूळ लेण्यांमधील बौद्ध, हिंदू आणि जैन धर्मीय शिल्पकलेचा अनमोल वारसा पावसाळ्यात अधिकच खुलून दिसतो. विशेषतः कैलास मंदिराचे भव्य शिल्प, सभोवतालचा निसर्ग आणि धुक्याने वेढलेला परिसर पर्यटकांना मंत्रमुग्ध करतो. त्यामुळे शनिवार-रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी राज्यासह देश-विदेशातील पर्यटकांची लक्षणीय गर्दी होत आहे. पर्यटनाला चालना मिळाल्याने स्थानिक मार्गदर्शक, हॉटेल व्यावसायिक, हस्तकला विक्रेते आणि अन्य लघुउद्योजकांच्या व्यवसायालाही चांगला हातभार लागत आहे. पर्यटकांनी ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी स्वच्छता राखावी, लेण्यांमधील शिल्पांना स्पर्श करू नये आणि पावसाळ्यात घसरड्या भागात आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. इतिहास, कला आणि निसर्ग यांचा अविस्मरणीय अनुभव घ्यायचा असेल, तर पावसाळ्यातील वेरूळ लेण्या पर्यटकांसाठी सर्वोत्तम ठिकाण ठरत आहेत.
-संकलित
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment