श्री केदारेश्वर मंदिर हे यवतमाळ शहरातील सर्वांत प्राचीन, ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचे मंदिर मानले जाते. हे मंदिर अंदाजे १२व्या शतकातील असून हेमाडपंती स्थापत्यशैलीचा प्रभाव त्यावर दिसून येतो.
श्री केदारेश्वर मंदिर हे यवतमाळ शहरातील सर्वांत प्राचीन, ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचे मंदिर मानले जाते. हे मंदिर अंदाजे १२व्या शतकातील असून त्यावर हेमाडपंती स्थापत्यशैलीचा प्रभाव दिसून येतो.
श्री केदारेश्वर मंदिर हे यवतमाळचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाते. स्थानिक परंपरेनुसार, यवतमाळ शहराची जडणघडण या मंदिराला केंद्रस्थानी ठेवून करण्यात आली आहे. त्यामुळे हे मंदिर केवळ श्रद्धेचे केंद्र नसून, यवतमाळचा इतिहास, संस्कृती आणि शहराच्या विकासाचे प्रतीक मानले जाते.
मंदिरात भगवान केदारेश्वराचा पितळी मुखवटा आणि तांब्याचा नाग जतन करून ठेवण्यात आला आहे.
गाभारा सुमारे ४ फूट खोल असून त्यातील स्वयंभू शिवलिंग हे मंदिराचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. पूर्वी या परिसरात स्मशानभूमी असल्याचा उल्लेख आढळतो. मंदिरासमोर प्राचीन कुंड असून त्याचा नंतर जीर्णोद्धार करण्यात आला.
मंदिराच्या परिसरात गणपती, लक्ष्मी, शीतलामाता आणि काळभैरव यांच्या प्राचीन मूर्ती आहेत. शीतलामातेची मूर्ती अत्यंत प्राचीन असून ती एखाद्या यक्षमूर्तीचा भाग असावी, असे काही अभ्यासकांचे मत आहे.
ऐतिहासिक महत्त्व
प्रसिद्ध अभिनेते पृथ्वीराज कपूर यांनी यवतमाळमध्ये नाट्यप्रयोगांच्या काळात या मंदिरात वास्तव्यास असल्याची नोंद आहे.
१६ ऑगस्ट १९०५ रोजी यवतमाळमधील महिलांची पहिली सार्वजनिक सभा याच मंदिरात भरली.
१६ ऑक्टोबर १९०५ रोजी स्वदेशी चळवळीच्या समर्थनार्थ येथे सभा झाली आणि मंदिरासमोरील मैदानात विदेशी कापडांची होळी करण्यात आली.
स्वदेशी आंदोलनाच्या कार्यात या मंदिराने महत्त्वाची भूमिका बजावली.
आजही श्री केदारेश्वर मंदिर हे यवतमाळचे ग्रामदैवत, श्रद्धास्थान आणि शहराच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय वारशाचे जिवंत प्रतीक म्हणून ओळखले जाते. अधिक माहितीसाठी संपर्क : परिक्षीत कमलकिशोर शर्मा जिल्हा व्यवस्थापक ९११२२२७६३३ जिल्हा कार्यालय पत्ता : स्वामी समर्थ विहार, पहिला माळा, फ्लॅट क्रमांक ए-१, अवधूतवाडी, तिवारी चौक, यवतमाळ - ४४५ ००१ ई-मेल : amrut.yavatmal.dm@gmail.com
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment