ग्राहकराजा जागा हो!

भारतात दर वर्षी २४ डिसेंबर हा दिवस भारतीय ग्राहक दिन किंवा राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने...

ग्राहकराजा जागा हो! मुख्य फोटो
मुख्य फोटो

ग्राहकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे आणि त्यांचे शोषण थांबवणे हा ग्राहक दिनाचा मुख्य उद्देश आहे.

२४ डिसेंबर १९८६ रोजी राष्ट्रपतींनी ग्राहक संरक्षण कायदा (Consumer Protection Act 1986) मंजूर केला होता. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दर वर्षी या दिवशी राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस साजरा केला जातो. काळानुसार बदलत्या गरजा लक्षात घेऊन केंद्र सरकारने ग्राहक संरक्षण कायदा २०१९ लागू केला आहे. त्याने १९८६च्या जुन्या कायद्याची जागा घेतली आहे. या कायद्यानुसार भारतीय ग्राहकांना सहा मुख्य अधिकार देण्यात आले आहेत :
सुरक्षेचा अधिकार : आरोग्यास घातक असलेल्या वस्तूंपासून संरक्षण मिळवण्याचा अधिकार.
माहितीचा अधिकार : वस्तूची गुणवत्ता, वजन, किंमत आणि शुद्धता याबद्दल माहिती मिळवण्याचा अधिकार.
निवडीचा अधिकार : स्पर्धात्मक किमतीत विविध उत्पादनांमधून निवड करण्याचा अधिकार.
तक्रार मांडण्याचा अधिकार : ग्राहकांच्या हितसंबंधांशी संबंधित व्यासपीठांवर आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार.
निवारण मिळवण्याचा अधिकार : अनैतिक व्यापाराविरुद्ध किंवा ग्राहकांच्या फसवणुकीविरुद्ध मोबदला/न्याय मिळवण्याचा अधिकार.
ग्राहक शिक्षणाचा अधिकार : आपल्या हक्कांबद्दल माहिती आणि ज्ञान मिळवण्याचा अधिकार.

https://consumerhelpline.gov.in/public/

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 23-12-2025 News publication date | Time: 06:48 PM News publication time | Views: 68 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 23-12-2025 News publication date | Time: 06:48 PM News publication time | Views: 68 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words