कौटुंबिक वाटणीची मोजणी आता अवघ्या २०० रुपयांत

जमीन मोजणीच्या शुल्कात आणि वर्गीकरणासाठी उपयुक्त शासकीय योजना-

कौटुंबिक वाटणीची मोजणी आता अवघ्या २०० रुपयांत मुख्य फोटो
मुख्य फोटो

जमीन मोजणीच्या शुल्कात आणि वर्गीकरणात मोठे बदल करून जनतेला मोठा दिलासा दिला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे आता कुटुंबातील वाटणीची मोजणी अवघ्या २०० रुपयांत करता येणार आहे. तर नियमित मोजणी ९० दिवसांत आणि जलद मोजणी ३० दिवसांत पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

जमीन मोजणीचे नवे दरपत्रक-

कौटुंबिक वाटणी मोजणी

• कोर्ट वाटप किंवा संमतीने होणाऱ्या मोजणीसाठी प्रति पोटहिस्सा अवघे २०० रुपये शुल्क आकारले जाईल.

ग्रामीण भागासाठी (२ हेक्टरपर्यंत)

• नियमित मोजणी: २,००० रुपये

• द्रुतगती मोजणी: ८,००० रुपये

शहरी भागासाठी (१ हेक्टरपर्यंत)-

• नियमित मोजणी: ३,००० रुपये

• द्रुतगती मोजणी: १२,००० रुपये

• अर्जदार गैरहजर राहिल्यास दंड (पुनर्भेट शुल्क): मोजणीच्या दिवशी अर्जदार गैरहजर राहिल्यास मूळ शुल्काच्या ५०% किंवा कमाल १०,००० रुपये दंड आकारला जाईल.

• भूमापक गैरहजर राहिल्यास सवलत: मोजणीच्या दिवशी अधिकारी (भूमापक) अनुपस्थित राहिल्यास अर्जदाराला कोणतेही पुनर्भेट शुल्क लागणार नाही.

• गुंठेवारी मोजणी: महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियमांतर्गत येणाऱ्या भूखंडांच्या मोजणीसाठी दीडपट शुल्क आकारले जाईल.

• उच्चतपासणी फी: कनिष्ठ भूमापकाच्या मोजणीवर आक्षेप असल्यास, वरिष्ठ पातळीवर तपासणीसाठी ३ ते ५ पट अधिक शुल्क मोजावे लागेल.

• सरकारी संस्थांना सवलत: निमशासकीय संस्थांना मोजणी दरात ५०%, तर पूर्णतः शासकीय जमिनींना ७५% सवलत मिळेल.

संपूर्ण निर्णय पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा!

Facebook -

https://www.facebook.com/share/p/17qSkC1eXi/

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 19-06-2026 News publication date | Time: 02:25 PM News publication time | Views: 99 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 19-06-2026 News publication date | Time: 02:25 PM News publication time | Views: 99 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement