कामाची उंची आणि खोली वाढवण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे - सुहासजी हिरेमठ

अमृत संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्यवस्थापक , अमृत मित्र व सखी यांच्या दिवसीय निवासी शिबीराचे उद्घाटन

कामाची उंची आणि खोली वाढवण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे - सुहासजी हिरेमठ मुख्य फोटो
मुख्य फोटो

"समाजातील सर्व वर्गांची उन्नती करणे हे सरकारचे काम आहे. समाजातील कोणताही वर्ग मागे राहिला तर संपूर्ण समाज मागे राहतो, दुर्बल राहतो. समाजातील सर्व घटकांना पुढे येण्यासाठी आधार देण्याचे काम अमृत सारख्या संस्था करतात. पण समाजाची उन्नती करत असताना त्यांचे चारित्र्यनिर्माण होणे, ही सुद्धा आपलीच कर्तव्ये आहेत. व्यक्तीनिर्माणातून जेव्हा चारित्र्यनिर्माण होते, तेव्हाच देश खऱ्या अर्थाने घडतो."

अमृत (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या पाच दिवसीय कर्मचारी प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन झाले, त्याप्रसंगी सुहासजी हिरेमठ (अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ)वक्ते म्हणून बोलत होते. यापुढे ते म्हणाले की, "आपण कैक पटींनी पुण्यवान आहोत म्हणून आपला जन्म भारतात झाला. त्यामुळे आपल्या देशातील प्रत्येक नागरिक सुशिक्षित तर झालाच पाहिजे, पण त्याचबरोबर तो सुसंस्कृतही झाला पाहिजे. यामुळेच स्वार्थी आणि संकुचित वृत्तीचा त्याग करून 'राष्ट्रप्रथम' या भावनेने कार्य करणे अपेक्षित आहे. त्यासाठी स्वदेशी, स्वभाषा, संस्कृती आणि बचत या गोष्टी कराव्या लागतील. अमृत प्रतिनिधी म्हणून कर्मचारी न होता कार्यकर्ता या भावनेने जर काम केले तरच ते साध्य होणार आहे. कामातून माणूस जोडला जाणे महत्त्वाचे आहे. यासाठी आपल्याला दिलेल्या कामाची उंची आणि खोली वाढविण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करावा."

यावेळी अमृत संस्थेचे मा. व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय जोशी यांनी आपल्या प्रास्ताविकातून अमृताची सुरुवात आणि इथपर्यंतचा संघर्षमय प्रवास उलगडला. अमृत संस्थेच्या आताच्या प्रगतीची राज्यभरातील अनेक संस्था दखल घेत असल्याचे त्यांनी सांगितले. या सारख्या शिबिरातून काही नवीन उपक्रम, कौशल्ये आणि कल्पना शिकण्याची गरजही त्यांनी सांगितली. "अधिकाधिक जबाबदारीने आणि कार्यक्षमतेने कार्य करणे यापुढे अपेक्षित आहे", असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता पूजनाने झाली. या निवासी शिबिरात राज्यातील ३६ जिल्ह्यातून अमृत व्यवस्थापक, अमृत मित्र आणि सखी उपस्थित आहेत. हे शिबिर अमृतच्या औंध येथील मुख्यालयात दिनांक १४ जून ते १८ जून पर्यंत होणार आहे.

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 14-06-2026 News publication date | Time: 09:22 PM News publication time | Views: 503 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 14-06-2026 News publication date | Time: 09:22 PM News publication time | Views: 503 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 2 Comments

A
Anand Oak
14-06-2026 10:14 PM

नमस्कार मी आनंद ओक रा. अमरावती माझे अमूर्त पेठ EDP program झाला आहे. त्यामध्ये व्यवसाय निवड करून सुरुवात करण्यासाठी आणि पॅकिंग आणि ब्रॅण्ड बनविणे मार्केटिंग करण्यासाठी खूपच अप्रतिम मार्गदर्शन केले.माझे cmegp लोन चा व्याज परतावा शुक्रवारी रात्री 10: 18 वाजता मा. प्रवीण सर अमरावती ह्यांनी कळवले.
अमूर्त पेठ विभाग अमरावती

आनंद ओक
14-06-2026 10:06 PM

My cmegp lone kese vyja petava Frist amount 12,000 rupees Bank account on Friday. Thanks to praveen sir and ashwerini mandam and rukshesh sir and Kedar sir and AMRUT peth sakhi Sakshi Mandam AMRUT peth Amravati and All amurt path team Pune . Thanks for amurt

Write a Comment
0 / 50 words
Advertisement