अमृत योजनेच्या लाभार्थींची यशोगाथा
रिसोड, प्रतिनिधी: जिद्द, परिश्रम आणि योग्य वेळी मिळालेल्या आर्थिक पाठबळाच्या बळावर विद्यार्थ्यांची स्वप्ने साकार होतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे रिसोड येथील विद्यार्थी रौनक पंकज छित्तरका. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या आयआयटी अर्थसहाय्य योजनेचा लाभ मिळाल्याने रौनक यांच्या उच्च शिक्षणाचा मार्ग अधिक सुकर झाला आहे.
देशातील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या Indian Institute of Technology Kharagpur मध्ये प्रवेश मिळवून रौनक यांनी आपल्या कुटुंबासह रिसोड शहराचे नाव उज्ज्वल केले आहे. गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले असले तरी पुढील शिक्षणासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य हा एक महत्त्वाचा टप्पा होता. ही गरज ओळखून अमृतच्या आयआयटी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत त्यांच्या बँक खात्यात ६० हजार रुपयांची आर्थिक मदत जमा करण्यात आली आहे.
या सहाय्यामुळे रौनक यांना शिक्षणाशी संबंधित विविध खर्च भागवणे शक्य होणार असून, त्यांचे संपूर्ण लक्ष आता अभ्यास आणि करिअर घडविण्यावर केंद्रित करता येणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये उच्च शिक्षणाविषयी जागृती निर्माण करणे आणि आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही गुणवंत विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, हा अमृत संस्थेच्या या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
रौनक यांच्या यशामुळे परिसरातील इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असून, कठोर परिश्रम आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावरील संस्थांमध्ये प्रवेश मिळवता येतो, हा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
यावेळी रौनक छित्तरका यांनी अमृत संस्थेचे आभार मानत सांगितले की, “अमृतकडून मिळालेल्या या आर्थिक सहाय्यामुळे माझ्या पुढील शिक्षणाचा मोठा भार हलका झाला आहे. या मदतीमुळे मला आयआयटी खडगपूर येथे शिक्षण घेण्यासाठी अधिक आत्मविश्वास मिळाला असून, भविष्यात समाजासाठी आणि देशासाठी योगदान देण्याचा मी प्रयत्न करेन.”
अमृतच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिले जाणारे हे अर्थसहाय्य केवळ आर्थिक मदत नसून त्यांच्या स्वप्नांना नवी उभारी देणारे आणि उज्ज्वल भविष्याची दिशा दाखवणारे पाऊल ठरत आहे. रिसोडच्या रौनक छित्तरका यांचे हे यश निश्चितच वाशिम जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असून इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे ठरत आहे. रिसोडच्या रौनक चित्ररखा यांचे हे यश निश्चितच वाशिम जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असून इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment