कृत्रिम सेवांच्या आहारी गेलेल्या नागरिकांना पर्यावरणाचे महत्व कळायला हवे , यासाठी जागतिक पर्यावरण दिन ही एक उत्तम संधी आहे.
जागतिक पर्यावरण दिन २०२६ जागतिक पर्यावरण दिन हा दरवर्षी ५ जून रोजी साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश म्हणजे लोकांमध्ये पर्यावरण संरक्षणाबाबत जागरुकता निर्माण करणे. कारण आता हवामान बदल ही सर्वात मोठी समस्या निर्माण झाली आहे. लोकांमध्ये पर्यावरण संरक्षणाबाबत जागरुकता निर्माण करणे. वायू, पाणी व जमीन प्रदूषण कमी करणे. तसेच वृक्षारोपण वाढवणे, नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर, लोकांना पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्यास प्रेरित करणे,हे सगळे आपल्यासाठी आणि आपल्या अस्तित्वासाठी खूप महत्वाचे आहेत. जागतिक पर्यावरण दिन आजच्या काळात खूप महत्त्वाचा आहे कारणः पृथ्वीवर प्रदूषण वेगाने वाढत आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे हवामान बदल होत आहेत. जैवविविधता कमी होत आहे. पाणी टंचाई, जंगलतोड, प्लास्टिक कचरा वाढत आहे. त्यामुळे हा दिवस लोकांना पर्यावरण वाचवण्यासाठी एकत्र आणतो. जागतिक पर्यावरण दिन सर्वसाधारणपणे खालील प्रकारे साजरा केला जातो- वृक्षारोपण कार्यक्रम, स्वच्छता मोहीम, रॅली आणि जनजागृती, शाळा/महाविद्यालयात भाषण स्पर्धा, प्लास्टिक विरोधी अभियान, नदी व तलाव स्वच्छता, पर्यावरण विषयक कार्यशाळा, प्लास्टिकचा वापर कमी करा, पाणी वाचवा. ऊर्जा बचत करा. कचरा व्यवस्थापन . पर्यावरणपूरक उत्पादन वापराचे आवाहन आपण सर्वांनी मिळून पर्यावरणाचे रक्षण केले तरच भविष्यातील पिढ्यांसाठी सुरक्षित आणि स्वच्छ पृथ्वी निर्माण होईल "पर्यावरण वाचवा, भविष्य घडवा"- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नागरिकांसाठी सूचना:- जास्तीत जास्त वृक्षारोपण करून लावलेल्या झाडांचे संगोपन करावे. प्लास्टिक पिशव्या व एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक वस्तूंचा वापर टाळावा. घरातील ओला व सुका कचरा वेगळा करून योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी. पाणी व वीज यांचा काटकसरीने वापर करावा.
वाहनांचा अनावश्यक वापर टाळून सायकल, सार्वजनिक वाहतूक किंवा पायी चालण्यास प्राधान्य द्यावे. नद्या, तलाव, विहिरी व इतर जलस्रोतांमध्ये कचरा टाकू नये. परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नियमित स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हावे. जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी वन्यजीव व पक्ष्यांना हानी पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी. पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर वाढवावा व पुनर्वापर (Reuse) आणि पुनर्चक्रण (Recycle) यांना प्रोत्साहन द्यावे. पर्यावरण संवर्धनाबाबत कुटुंब, मित्र व समाजामध्ये जनजागृती करावी. शेतकरी बांधवांनी रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा संतुलित वापर करून सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन द्यावे. हवेचे व ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी नियमांचे पालन करावे. संदेश: "निरोगी पर्यावरण हीच उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्ली आहे. चला, पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारून हरित आणि स्वच्छ भारत घडवूया."
-संकलित
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment