कोल्हापूर जिल्ह्यातील इंचनाल येथील प्राचीन स्वयंभू गणेश मंदिर

फेब्रुवारीत होतो अनोखा किरणोत्सव

कोल्हापूर जिल्ह्यातील इंचनाल येथील प्राचीन स्वयंभू गणेश मंदिर  मुख्य फोटो
कोल्हापूर जिल्ह्यातील इंचनाल येथील प्राचीन स्वयंभू गणेश मंदिर  अतिरिक्त फोटो

कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यातील इंचनाळ गावात एक प्रसिद्ध व प्राचीन गणेश मंदिर आहे. हिरण्यकेशीच्या तीरावर असलेल्या या मंदिरातील गणेशावर फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उगवत्या सूर्याच्या पहिली किरणांचा अभिषेक होतो. येथील गणपती हाकेला धावणारा व नवसाला पावणारा आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. 

इ. स. १९०७-०८ साली या पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार गोपाळ आप्पाजी कुलकर्णी यांनी केल्याची नोंद आहे. त्यानंतर श्री गजानन ग्रामस्थ सेवा मंडळ, इंचनाल, मुंबई आणि स्थानिक ग्रामस्थ यांनी मिळून १९८७ ते १९९२ या काळात पुन्हा एकदा हे मंदिर नव्याने बांधून काढले. त्यासाठी गोकाकवरून आणलेला आरभाव जातीचा दगड वापरला गेला आहे. करवीर पीठाच्या शंकराचार्यांच्या हस्ते चार मे १९९२ रोजी मंदिराचा कलशारोहण समारंभ झाला. मोठा प्रशस्त सभामंडप, बाजूला बगीचा, महादेव मंदिर असा हा रम्य परिसर आहे.

इंचनालच्या या मंदिरातील गणेशमूर्ती बैठी असून, तिची उंची अंदाजे सव्वादोन फूट एवढी आहे. काळ्या पाषाणातली ही मूर्ती शांत आणि प्रसन्न दिसते. चतुर्भुज गणेशाच्या हातात पाश, अंकुश, पात्र असून, एक हात वरद मुद्रेत आहे. या मंदिराची देखभाल देवस्थान समितीकडे आहे. देवाच्या नावाने सुमारे नऊ एकर बागायती जमीन आहे. माघ महिन्यामध्ये गणेश जयंतीला इथे मोठा उत्सव आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाते. कोल्हापूर, सावंतवाडी, गोवा, बेळगाव इथून भाविक या वेळी इथे दर्शनाला येतात. ३००हून अधिक वर्षांपासून या गणपतीच्या पूजेची व्यवस्था महागावच्या दंडगे (जोशी) घराण्याकडे दिलेली आहे.

Publisher: Abhijeet Kulkarni News publisher name | Date: 30-05-2026 News publication date | Time: 02:44 PM News publication time | Views: 292 Number of times this news has been viewed | District: Kolhapur Related district of the news
Publisher: Abhijeet Kulkarni News publisher name | Date: 30-05-2026 News publication date | Time: 02:44 PM News publication time | Views: 292 Number of times this news has been viewed | District: Kolhapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement