अमृत संस्थेच्या अहिल्यानगर कार्यालयात सावरकरांना अभिवादन

त्यांच्या कार्याचे करण्यात आले स्मरण

अमृत संस्थेच्या अहिल्यानगर कार्यालयात सावरकरांना अभिवादन मुख्य फोटो
अमृत संस्थेच्या अहिल्यानगर कार्यालयात सावरकरांना अभिवादन अतिरिक्त फोटो

अहिल्यानगर : महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या अहिल्यानगर जिल्हा कार्यालयात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना १४३व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला. 

या कार्यक्रमाला अमृतसखी गौरी कुलकर्णी, अमृतमित्र वैभव कुलकर्णी, सुजल झुंजारे, निखिल झुंजारे व सुशांत हिरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन अमृतसखी गौरी कुलकर्णी व वैभव कुलकर्णी यांनी केले.

२८ मे १८८३ रोजी नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे जन्मलेल्या सावरकरांचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण योगदान होते. 'अभिनव भारत' या क्रांतिकारी संघटनेची स्थापना, १८५७चे स्वातंत्र्यसमर या ऐतिहासिक ग्रंथाचे लेखन, तसेच अंदमानातील सेल्युलर जेलमध्ये भोगलेली कठोर शिक्षा यामुळे त्यांचे कार्य विशेष स्मरणीय ठरते. समाजातील अस्पृश्यता निर्मूलन, राष्ट्रभक्ती, स्वाभिमान आणि विज्ञाननिष्ठ विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी मोठे कार्य केले. त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/


Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 28-05-2026 News publication date | Time: 05:29 PM News publication time | Views: 356 Number of times this news has been viewed | District: Ahilyanagar Related district of the news
Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 28-05-2026 News publication date | Time: 05:29 PM News publication time | Views: 356 Number of times this news has been viewed | District: Ahilyanagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement