महान भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा २२ डिसेंबर हा जन्मदिन राष्ट्रीय गणित दिवस म्हणून ओळखला जातो.
श्रीनिवास रामानुजन हे त्यांच्या अद्वितीय प्रतिभेसाठी आणि गणितातील अमूल्य योगदानासाठी ओळखले जातात. त्यांनी जागतिक गणितावर आपला ठसा उमटवला. ते एक महान भारतीय गणितज्ञ होते. त्यांचा जन्म २२ डिसेंबर १८८७ रोजी तमिळनाडूमध्ये झाला. त्यांनी गणिताचे कोणतेही औपचारिक शिक्षण घेतले नव्हते. जी. एस. कार यांच्या 'Synopsis of Elementary Results in Pure Mathematics' या पुस्तकाने त्यांना प्रेरणा दिली. औपचारिक प्रशिक्षण नसतानाही त्यांनी गणितीय विश्लेषण, संख्या सिद्धांत, अनंत मालिका (Infinite Series) आणि सतत अपूर्णांक (Continued Fractions) यांसारख्या गणिताच्या क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी स्वतःचे गणितीय नियम आणि सिद्धांत विकसित केले. ते त्यांच्या फ्रेयड नोटबुक (Frayed Notebook) या पुस्तकात आढळतात. त्यांनी सुमारे चार हजार मूळ प्रमेये (theorems) दिली. त्यांचा अभ्यास आजही सुरू आहे आणि त्यांचे कार्य युलर (Euler) आणि गॉस (Gauss) यांच्यासारख्या महान गणितज्ञांच्या बरोबरीचे मानले जाते. प्रा. जी.एच. हार्डी यांच्या मदतीने ते केम्ब्रिज विद्यापीठात गेले. तिथे त्यांच्या कार्याची जागतिक स्तरावर दखल घेतली गेली. त्यामुळे त्यांचे कार्य आजही जगभरातील गणितज्ञांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या सन्मानार्थ २२ डिसेंबर हा राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो. वयाच्या अवघ्या ३२व्या वर्षी २६ एप्रिल १९२० रोजी आजारपणामुळे त्यांचे निधन झाले. मृत्यूपर्यंत ते गणितीय प्रमेय लिहीत होते.
(संकलित माहिती)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment