अमृतमित्र वैभव कुलकर्णी यांनी भेट घेऊन दिली माहिती
अहिल्यानगर : खातगाव (ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) येथील आनंदी नारायण कृपा न्यास श्री समर्थ रामदास स्वामी मठचे मठाधिपती समर्थभक्त श्री मोहनबुवा रामदासी यांची अमृतमित्र वैभव कुलकर्णी यांनी भेट घेतली. या वेळी झालेल्या संवादात मोहनबुवा रामदासी यांना अमृत संस्थेच्या कार्याची माहिती जाणून घेतली. त्यांनी अमृत संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली आणि पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या.
मोहनबुवा रामदासी हे समर्थ रामदास स्वामींच्या विचारांचा प्रसार करणारे एक थोर समर्थभक्त व थोर कीर्तनकार आहेत. त्यांनी अनेक वर्षे सज्जनगडावर सेवा केली असून, समर्थ साहित्याचा प्रसार व समाजजागृतीसाठी ते कार्यरत आहेत.
२०११ साली त्यांनी अहिल्यानगरमधील खातगाव येथे श्री समर्थ रामदास स्वामी मठाची स्थापना केली. श्री समर्थ वाङ्मय प्रचार व प्रसार, श्री मनाचे श्लोक व श्री दासबोध प्रशिक्षण वर्ग, वेदपाठशाळा व बालसंस्कार वर्ग, सूर्यनमस्कार व योगसाधना, रामदासी आणि वारकरी कीर्तन महोत्सव व प्रशिक्षण वर्ग अशा त्यांच्या भावी योजना असल्याचे त्यांनी सांगितले.
अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक : 9112228769
पत्ता : अमृत कार्यालय, आकाशवाणी केंद्रासमोर,
प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर - ४१४००३
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment