अहिल्यानगरमधून मध्य प्रदेशात निघालेल्या परिक्रमेच्या स्वागताप्रीत्यर्थ अमृत कार्यालयात सोहळा
छत्रपती संभाजीनगर : अहिल्यानगरमधून सुरू झालेल्या आणि मध्य प्रदेशातील जानापावपर्यंत जाणार असलेल्या भगवान परशुराम परिक्रमेचे छत्रपती संभाजीनगरमध्ये आगमन झाले. त्या परिक्रमेचे अमृत संस्थेच्या छत्रपती संभाजीनगर कार्यालयात उत्साहात स्वागत करण्यात आले. ब्रह्मवृंदाच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात झाली. अहिल्यानगरमधील श्री चिरंजीव प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील विविध ब्राह्मण समाज संघटनांच्या संयुक्त विद्यमाने ही परिक्रमा आयोजित करण्यात आली आहे.
ब्राह्मण समाजासह खुल्या प्रवर्गातील ज्यांना अन्य कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही, अशांसाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था कार्यरत आहे. या अमृत संस्थेचे राज्य व्यवस्थापक दीपक जोशी यांच्या हस्ते या वेळी भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. उपस्थितांनीही भक्तिभावाने पूजन केले. या कार्यक्रमाला विजयाताई कुलकर्णी, शुभंकर घटने, शिवप्रसाद पुंडे, महेश देशपांडे, गंगेय कुलकर्णी, पौर्णिमा जोशी, अक्षय सराफ, बाळासाहेब जगताप यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि ब्रह्मवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अमृत संस्थेच्या वतीने जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे, उपव्यवस्थापक योगेश रोडे, तसेच अमृतसखी मंजू कुलकर्णी, ऋचा शर्मा, विनया कुलकर्णी यांनी परिक्रमा मंडळाचे स्वागत केले. या वेळी रायझिंग स्टार किड्स स्कूलमधील विद्यार्थी व शिक्षकांनीही कार्यक्रमात सहभाग नोंदवला.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment