सातारा : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचे अधिकारी विनायक पाठकजी यांनी नुकतीच साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी अमृत संस्थेमार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची आणि उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.
सातारा : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचे अधिकारी विनायक पाठकजी यांनी नुकतीच साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी अमृत संस्थेमार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची आणि उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. संस्थेचे कार्य ऐकून जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त करून विशेष कौतुक केले. तसेच, अमृत संस्थेच्या योजनांचा लाभ जास्तीत जास्त जणांना कसा घेता येईल, यासाठी सहकार्याचे आश्वासन दिले.
महाराष्ट्र राज्य संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही संस्था प्रामुख्याने खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत आहे. या घटकातील तरुण-तरुणींना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी संस्था विशेष प्रयत्न करत आहे. खुल्या प्रवर्गातील होतकरू तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी प्रशिक्षण आणि मार्गदर्शन पुरवणे, आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट राहू नये यासाठी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरिता अर्थसाह्य उपलब्ध करून देणे, कौशल्यविकास कार्यक्रमांच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराभिमुख बनवणे असे कार्य या संस्थेमार्फत विविध योजनांच्या माध्यमातून केले जात असल्याचे पाठकजी यांनी पाटील यांना सांगितले.
समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अशा योजनांची मोठी गरज आहे. उद्योजक घडवल्यामुळे केवळ एका व्यक्तीचा नाही, तर संपूर्ण कुटुंबाचा विकास होतो, असे कौतुकोद्गार जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी काढले. जिल्ह्यामध्ये या योजनांचा लाभ जास्तीत जास्त गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment