विजय हजारे

नामवंत क्रिकेटपटू विजय हजारे यांचा १८ डिसेंबर हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने...

फोटो उपलब्ध नाहीत

या बातमीशी संबंधित कोणतेही फोटो उपलब्ध नाहीत

विजय हजारे यांचा जन्म ११ मार्च १९१५ रोजी सांगलीमध्ये झाला. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने १९५१-५२मध्ये मद्रास येथे इंग्लंडविरुद्ध पहिला कसोटी विजय मिळवला होता. त्यांनी १९४६ ते १९५३दरम्यान ३० कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यापैकी १४ सामन्यांमध्ये त्यांनी कर्णधारपद भूषवले. १९४७-४८मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकाच कसोटी सामन्याच्या (ॲडलेड) दोन्ही डावांत शतके झळकावणारे ते पहिले भारतीय फलंदाज ठरले. कसोटी क्रिकेटमध्ये सलग तीन सामन्यांत शतके ठोकण्याचा विक्रमही त्यांनी केला. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्रिशतक (३१६ धावा) झळकावणारे ते पहिले भारतीय खेळाडू होते. १९६०मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. १८ डिसेंबर २००४ रोजी वडोदरा येथे दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले.
त्यांच्या स्मरणार्थ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) २००२-०३मध्ये देशांतर्गत एकदिवसीय (५० षटके) स्पर्धेला 'विजय हजारे ट्रॉफी' असे नाव दिले. ही स्पर्धा भारतात दर वर्षी राज्य स्तरावरील संघांमध्ये खेळवली जाते. २०२५-२६चा हंगाम डिसेंबर २०२५ मध्ये सुरू झाला आहे.

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 18-12-2025 News publication date | Time: 12:00 AM News publication time | Views: 55 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 18-12-2025 News publication date | Time: 12:00 AM News publication time | Views: 55 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words