निसाबा गोदरेज

उद्योगजगत आणि सामाजिक कार्य या दोन्ही क्षेत्रांत अग्रणी स्त्रीशक्ती

निसाबा गोदरेज मुख्य फोटो
मुख्य फोटो

निसाबा गोदरेज (ज्यांना 'निसा' म्हणूनही ओळखले जाते) या एक यशस्वी भारतीय उद्योजिका आणि गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडच्या (GCPL) कार्यकारी अध्यक्षा आहेत. त्यांचा जन्म १९७८ मध्ये झाला असून त्या प्रसिद्ध उद्योगपती आदी गोदरेज आणि परमेश्वर गोदरेज यांची सर्वात धाकटी कन्या आहेत. त्यांचे शालेय शिक्षण मुंबईतील 'द कॅथेड्रल अँड जॉन कॉनन स्कूल'मध्ये झाले. त्यांनी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या व्हार्टन स्कूलमधून बॅचलर ऑफ सायन्स (BSc) आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीए (MBA) पदवी प्राप्त केली आहे.

निसाबा २००८ मध्ये गोदरेज समूहात सामील झाल्या आणि २०१७ मध्ये त्यांच्याकडे गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स ची धुरा सोपवण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने मोठी प्रगती केली असून त्यांनी रेमंडच्या अनेक ब्रँड्सच्या संपादनात त्या गोदरेज ॲग्रोव्हेट आणि 'टीच फॉर इंडिया' (Teach For India) च्या बोर्डावर देखील आहेत. याव्यतिरिक्त, त्या भारती एअरटेल आणि महिंद्रा अँड महिंद्रा सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये संचालक म्हणून कार्यरत आहेत.निसाबा गोदरेज समूहाच्या 'गुड अँड ग्रीन' (CSR) उपक्रमांचे नेतृत्व करतात आणि कॉर्पोरेट धोरणांमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे.

(संकलित)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 09-02-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 3 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 09-02-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 3 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement