सध्या महाराष्ट्रात सर्व ठिकाणी नवरात्री उत्सवाची धामधूम सुरू आहे. अशातच पौरोहित्य करणाऱ्या या दुर्गेची ही माहिती!
जळगाव : आशिया खंडातील प्रसिद्ध सुवर्णपेठ आणि केळी उत्पादनात अग्रेसर असलेला जळगाव जिल्हा सध्या नवरात्रोत्सवाच्या उत्साहात न्हाऊन निघाला आहे. घरोघरी भक्तिभावाने घटस्थापना केली जात असताना, पारोळा येथील श्रीमती मनीषा सतीश सोहनी यांनी तीन ठिकाणी घटस्थापना करून नवरात्रोत्सवाची परंपरा जपली आहे.
श्रीमती सोहनी या वर्षभर विविध धार्मिक पूजाविधी श्रद्धेने करतात. हरतालिका पूजन, वटसावित्री पौर्णिमा पूजन, श्रावण महिन्यात महादेवाच्या मंदिरात अभिषेक, सत्यनारायण पूजा,होलिकापूजन,गणपती प्राणप्रतिष्ठा तसेच वास्तुपूजन आणि भूमिपूजन असे धार्मिक विधी त्या करतात.
पती वैकुंठवासी असून, त्यांना एक कन्या आहे. प्रतिकूल परिस्थितीतही धार्मिक परंपरा आणि श्रद्धा जपणाऱ्या मनीषा सोहनी यांचा नवरात्रोत्सवातील हा उपक्रम विशेष उल्लेखनीय आहे. आपल्या परंपरांचा जागर करणारी ही दुर्गा खरोखर समाजासाठी प्रेरणास्थान आहे.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment