महिलांकरिता सदैव तत्पर असलेल्या राष्ट्रीय महिला आयोगाविषयी ३१ जानेवारी या स्थापना दिनानिमित्त थोडक्यात माहिती...
राष्ट्रीय महिला आयोग ही देशातील महिलांच्या हक्कांचे संरक्षण करणारी एक सर्वोच्च वैधानिक संस्था आहे. राष्ट्रीय महिला आयोग कायदा, १९९० अंतर्गत ३१ जानेवारी १९९२ रोजी या आयोगाची स्थापना करण्यात आली. या संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे. या आयोगाद्वारे महिलांच्या संवैधानिक आणि कायदेशीर हक्कांचे रक्षण केले जाते, त्यांच्या समस्यांना वाचा फोडली जाते आणि महिला कल्याणासाठी सरकारला शिफारशी केल्या जातात.
या आयोगाची प्रमुख कार्ये
कायदेशीर आढावा : महिलांशी संबंधित अस्तित्वात असलेल्या कायद्यांचे पुनरावलोकन करणे आणि आवश्यक सुधारणा सुचवणे.
तक्रार निवारण : महिलांवरील अत्याचार किंवा हक्कभंगाच्या तक्रारींची दखल घेणे आणि त्या सोडवण्यासाठी पुढाकार घेणे.
सल्लागार भूमिका : महिलांच्या सामाजिक-आर्थिक विकासाशी संबंधित धोरणात्मक बाबींवर केंद्र सरकारला सल्ला देणे.
अभ्यास आणि संशोधन : महिलांच्या स्थितीबद्दल विविध अंगांनी अभ्यास करणे आणि अहवाल प्रसिद्ध करणे.
जयंती पटनायक या आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा होत्या. ऑक्टोबर २०२४पासून विजया किशोर रहाटकर आयोगाच्या अध्यक्षा आहेत. आयोगामध्ये अध्यक्ष, पाच सदस्य आणि एक सचिव यांचा समावेश असतो. महिलांच्या संदर्भातील कोणत्याही विषयाची तक्रार असेल तर 14490 या हेल्पलाइन क्रमांकावर कधीही संपर्क साधता येतो.
अधिक माहितीसाठी संकेतस्थळ : https://www.ncw.gov.in
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment