नंदिनी हरिनाथ

भारतीय अंतराळ संशोधन केंद्रातील 'स्त्री-शक्ती'चे समर्थ उदाहरण

नंदिनी हरिनाथ मुख्य फोटो
मुख्य फोटो

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात 'इस्रो'ने अनेक विक्रम केले आहेत. 'इस्रो'च्या शास्त्रज्ञांनी देशाची मान जगात अभिमानाने उंचावली आहे. त्यांच्या परिश्रमाला, बुद्धिमत्तेला द्यावी तितकी दाद कमीच आहे. भारताच्या या गरुडभरारीचे यश साजरे करताना काही महिला शास्त्रज्ञांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. कारण, भारताला अंतराळात नेणाऱ्या या महिलांची गोष्ट सगळ्यांसाठीच प्रेरणादायी आहे. त्या महिलांपैकी एक आहेत नंदिनी हरिनाथ.

नंदिनी हरिनाथ यांची पहिलीच नोकरी 'इस्रो'मध्ये... टीव्हीवरील 'स्टार ट्रेक' ही मालिका पाहून विज्ञान विषय अभ्यासण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. कुटुंबात बहुतांश जण शिक्षक आणि इंजिनीअर असल्याने विज्ञान आणि तंत्रज्ञान यां विषयांविषयी स्वाभाविकच त्यांना आवड होती. गेली वीस वर्षे त्या 'इस्रो'मध्ये कार्यरत आहेत आणि अथक प्रयत्न करत आहेत. मंगलयान प्रक्षेपणाच्या काही दिवस आधी त्या घरीदेखील जात नव्हत्या. त्यांच्या कामाच्या कटिबद्धतेला नक्कीच सलाम करावा लागेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून, मुलांचा अभ्यास घेऊन १२-१४ तास त्यांनी अथक काम केले होते. 'आज जेव्हा वैज्ञानिक म्हणून आम्हाला ओळखले जाते, तेव्हा त्या कष्टांचे चीज झाल्यासारखे वाटते,' अशा शब्दांत आपल्या भावना त्या व्यक्त करतात. 'मंगलयानाचे यश हा भूतकाळ झाला, आता भविष्याचा विचार करायचा आहे,' असा निर्धार त्या व्यक्त करतात. त्यातून त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि दूरदृष्टी सहज जाणवते. अशा या स्त्रीशक्तीला वंदन!

(संकलित)


Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 23-01-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 77 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 23-01-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 77 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words