इस्रो संस्थेत कार्यरत असलेल्या कम्प्युटर इंजिनीअर
कृती फौजदार या एक ख्यातनाम वैज्ञानिक आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो या भारतीय संशोधन केंद्राच्या महिला संशोधकांपैकी त्या एक आहेत. उपग्रह आणि इतर मिशनवर देखरेख करणाऱ्या टीमच्या त्या प्रमुख सदस्या आहेत.
कृती यांचे बालपण बिहारमधील प्राचीन गाव असलेल्या वैशाली येथे गेले. इयत्ता पाचवीनंतर त्यांनी त्यांचे पुढील शालेय शिक्षण मध्य प्रदेश येथून पूर्ण केले. २०१३पासून कृती कर्नाटक येथील हसन या शहरात इस्रोमध्ये कम्प्युटर इंजिनीअर म्हणून कार्यरत आहेत. त्या संस्थेत असलेल्या मास्टर कंट्रोल फॅसिलिटी (एमसीएफ), भू-स्थित उपग्रह उदा. इन्सॅट (INSATs), जीसॅट (GSATs) आणि आयआरएनएसएस (IRNSSs) यांच्या पर्यवेक्षणाचे कामकाज पाहतात. हे उपग्रह जमिनीपासून ३६०० किलोमीटरवर पृथ्वीची परिक्रमा करतात. त्यांच्या या परिवलनाने हवामान आणि संचार सेवा यांचे कार्य केले जाते. मंगल मिशन या उपक्रमात कृती आणि तिच्या टीमला उपग्रहाच्या परिवलनाची दिशा अशा प्रकारे ठरवायची होती, ज्यामुळे सूर्य आणि चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा त्यावर परिणाम होणार नाही. कृती यांच्या या अनोख्या प्रवासाला आणि कार्याला नमन.
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment