अहिल्यानगरच्या भूमिपुत्र स्वामी गोविंददेवगिरी यांची श्रीराम मंदिर ट्रस्टच्या महासचिवपदी नियुक्ती

अहिल्यानगर जिल्ह्यातील बेलापूरचे भूमिपुत्र राष्ट्रसंत स्वामी गोविंददेवगिरी यांची अयोध्येतील श्रीराम मंदिर ट्रस्टच्या महासचिवपदी सर्वानुमते नियुक्ती झाली. त्यांच्या या निवडीमुळे अहिल्यानगर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

अहिल्यानगरच्या भूमिपुत्र स्वामी गोविंददेवगिरी यांची श्रीराम मंदिर ट्रस्टच्या महासचिवपदी नियुक्ती मुख्य फोटो
मुख्य फोटो

नगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील बेलापूर येथील भूमिपुत्र राष्ट्रसंत स्वामी गोविंददेवगिरी यांची अयोध्या येथील श्रीराम मंदिर ट्रस्टच्या महासचिवपदी सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. या पूर्वी ही कोशाध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. अहिल्यानगर साठी हा मोठा सन्मान आहे.ट्रस्टचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून भारतीय हवाई दलाचे निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची निवड करण्यात आली आहे.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार,अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी,सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी,सेनगुनथर,गुजराथी,जाट,लोहाना, हिंदू नेपाळी, भूमिहार,हिंदू-वीरशैव लिंगायत,हिंदू-लिंगायत व अगरवाल इत्यादी जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व 36 जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/ अमृत जिल्हा कार्यालय संपर्क क्रमांक :- 9112228769 जिल्हा कार्यालय पत्ता : वरुण अपार्टमेंट, आकाशवाणी केंद्र समोर,प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर - 414003

#Ahilyanagar #Belapur #SwamiGovindDevGiri #RashtraSant #Ayodhya #RamMandir #ShriRamMandir #RamMandirTrust #TempleTrust #HinduSaint #SpiritualLeader #Maharashtra #ILovenagarNews

Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 03-09-2026 News publication date | Time: 01:36 PM News publication time | Views: 99 Number of times this news has been viewed | District: Ahilyanagar Related district of the news
Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 03-09-2026 News publication date | Time: 01:36 PM News publication time | Views: 99 Number of times this news has been viewed | District: Ahilyanagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement