श्रावणी सोमवारनिमित्त सोलापूरमधील शिवमंदिरामध्ये शिवनामाचा गजर

पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त सोलापूर मधील श्री सिद्धेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; बाळीवेसच्या मल्लिकार्जुन मंदिरातही धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल!

 श्रावणी सोमवारनिमित्त सोलापूरमधील शिवमंदिरामध्ये शिवनामाचा गजर  मुख्य फोटो
मुख्य फोटो

सोलापूर: पवित्र श्रावण महिन्यातील पहिल्याच सोमवारी सोलापूर शहरात कमालीचा उत्साह पाहायला मिळाला. शहराचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. पहाटे ५ वाजल्यापासून सुरू झालेला भाविकांचा जनसागर थेट रात्री १ वाजेपर्यंत कायम होता. पहिल्या शिवमुठीच्या (तांदूळ) महापूजेचा मान पुजारी शिवशंकर हब्बू यांना मिळाला. ​मंदिरात केलेल्या मनमोहक व आकर्षक डेकोरेशनने (सजावटीने) उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त मंदिर प्रशासनाच्या वतीने विविध विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांसाठी पहाटेपासूनच दर्शन रांगा खुल्या करण्यात आल्या.दिवसभरात हजारो भाविकांनी 'हर हर महादेव' आणि 'श्री सिद्धेश्वर महाराजांच्या' जयघोषात दर्शन घेऊन पहिल्या श्रावण सोमवारचा आनंद लुटला.

याचप्रमाणे सोलापूरमधील इतर प्रसिद्ध शिवमंदीरामध्ये शिवभक्तीचा जागर झाला.


Publisher: Shreyas Kulkarni News publisher name | Date: 18-08-2026 News publication date | Time: 11:40 AM News publication time | Views: 22 Number of times this news has been viewed | District: Solapur Related district of the news
Publisher: Shreyas Kulkarni News publisher name | Date: 18-08-2026 News publication date | Time: 11:40 AM News publication time | Views: 22 Number of times this news has been viewed | District: Solapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement