छत्रपती संभाजीनगरमधील कर्णपुरा येथे नवरात्रोत्सवानिमित्त भक्तिमय वातावरण असून, श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. पारंपरिक कर्णपुरा यात्रा, विविध दुकाने आणि मनोरंजनाची साधने हे उत्सवाचे आकर्षण ठरत आहेत. भाविकांना दर्शनासाठी मार्गदर्शन करण्याचे कार्य दर्शनदूतांकडून केले जात आहे.
छत्रपती संभाजीनगर : शहरातील कर्णपुरा येथील श्री तुळजाभवानी माता मंदिरात शारदीय नवरात्रोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे. नवरात्रोत्सवानिमित्त देवीच्या दर्शनासाठी शहरासह विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने येत आहेत. कर्णपुरा देवीच्या दर्शनासोबतच येथे भरणारी पारंपरिक कर्णपुरा यात्रा हे या उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरते.
कर्णपुरा देवीला भाविकांमध्ये विशेष श्रद्धेचे स्थान आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात मंदिरात विविध धार्मिक विधी, पूजा आणि आरतीचे आयोजन केले जाते. देवीच्या जयघोषाने मंदिर परिसर भक्तिमय होतो.
नवरात्रोत्सवानिमित्त भरणाऱ्या कर्णपुरा यात्रेत विविध वस्तूंची दुकाने, खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि मनोरंजनाची साधने असतात. त्यामुळे यात्रेला येणाऱ्या भाविकांसह लहान मुलांमध्येही विशेष उत्साह पाहायला मिळतो. धार्मिक श्रद्धा आणि पारंपरिक यात्रेचा आनंद घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतात.दर्शनदूतांकडून मार्गदर्शन दर्शन साठी जेष्ठ नागरिकांसाठी सहकार्य केले जाते तसेच भाविकांना आवश्यक माहिती दिली जाते भाविकांना देवीचे दर्शन सुलभतेने घेता यावे व मदत करणे, अशा सेवांमुळे नवरात्रोत्सवातील व्यवस्थापनाला हातभार लागतो. श्रद्धा, भक्ती, परंपरा आणि सेवाभाव यांचा संगम असलेला कर्णपुरा नवरात्रोत्सव व यात्रा हे छत्रपती संभाजीनगरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनातील महत्त्वाचे आकर्षण आहे. संदर्भ -संकलित
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment