लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पावन जन्माने गौरवलेले चौंडी हे गाव महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वैभवाचे प्रतीक आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील हे प्रेरणास्थळ आजही त्यांच्या लोककल्याणकारी, न्यायप्रिय आणि आदर्श कार्याची साक्ष देत इतिहासप्रेमी व पर्यटकांना प्रेरणा देत आहे.
चौंडी हे महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील एक ऐतिहासिक गाव आहे. हे गाव लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मामुळे संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. अहिल्यादेवींचा जन्म ३१ मे १७२५ रोजी याच गावात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे चौंडी गावचे पाटील होते. त्या काळात स्त्रीशिक्षणाची प्रथा कमी असतानाही त्यांनी अहिल्यादेवींना वाचन, लेखन आणि संस्कारांचे शिक्षण दिले. बालपणी अहिल्यादेवींची बुद्धिमत्ता, साधेपणा आणि धार्मिक वृत्ती पाहून मराठा साम्राज्याचे सरदार मल्हारराव होळकर प्रभावित झाले. त्यांनी आपल्या पुत्र खंडेराव होळकर यांच्याशी अहिल्यादेवींचा विवाह लावून दिला. पुढे त्या मालवा संस्थानच्या आदर्श आणि न्यायप्रिय राज्यकर्त्या म्हणून प्रसिद्ध झाल्या.
चौंडी येथे काय पाहावे?
लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पावन जन्मभूमी चौंडी (ता. जामखेड, जि. अहमदनगर / अहिल्यानगर) ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक पर्यटनाचे प्रमुख केंद्र आहे. या परिसरामध्ये अनेक ऐतिहासिक किल्ले, निसर्गरम्य धबधबे आणि धार्मिक स्थळे आहेत.
चौंडीच्या आजूबाजूला असलेली प्रमुख पर्यटन स्थळे खालीलप्रमाणे आहेत:
१. अहिल्यादेवी होळकर जन्मस्थान व स्मारक, चौंडी
२. खर्डा किल्ला (शिवपत्तनम)
३. सौताडा धबधबा (Sautada Waterfall)
४. रेहकुरी काळवीट अभयारण्य (Rehkuri Blackbuck Sanctuary)
आज चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान, स्मारक, पुतळा, महादेव मंदिर आणि ऐतिहासिक वास्तू जतन करण्यात आल्या आहेत. दरवर्षी त्यांच्या जयंतीनिमित्त हजारो भाविक, इतिहासप्रेमी आणि पर्यटक येथे भेट देतात. महाराष्ट्र शासनाने चौंडीचा तीर्थक्षेत्र आणि स्मारक म्हणून विकास करण्यासाठी विविध सुविधा उभारल्या आहेत.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, सिंधी,कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी,जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार इत्यादी जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व 36 जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/ अमृत जिल्हा कार्यालय संपर्क क्रमांक :- 9112228769 जिल्हा कार्यालय पत्ता : वरुण अपार्टमेंट, आकाशवाणी केंद्र समोर,प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर - 414003
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment