एकलव्यासारखी साधना करून पेन्सिल ड्रॉइंग व स्केच आर्टमध्ये प्रवीण झालेली हिंगोलीची गायत्री जोशी
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील जिजामाता नगर येथे वास्तव्यास असलेली गायत्री नितीनराव जोशी ही तरुण व होतकरू कलाकार आपल्या अंगभूत कलेच्या जोरावर कलाक्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करत आहे. कोणतेही औपचारिक प्रशिक्षण न घेताही तिने पेन्सिल ड्रॉइंग व स्केच आर्ट या कलेत उल्लेखनीय प्रावीण्य मिळवले आहे. एकलव्याप्रमाणे कलेची साधना करून या विद्यार्थिनीने नाव मिळवले आहे.
अवघ्या १९ वर्षांची गायत्री जोशी ही कलाकार पेन्सिल ड्रॉइंग व स्केच आर्टमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आहे. तिच्या रेखाटनांमधून भावनांची उत्कटता, वास्तवदर्शी मांडणी आणि जिवंत रेषांचा प्रत्यय येतो. स्वतःवरील विश्वास, सातत्यपूर्ण सराव व कलेप्रति असलेली निष्ठा यांमुळे अल्पवयातच तिने कलाक्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. गायत्रीच्या रेखाटनांमध्ये तिची सूक्ष्म निरीक्षणशक्ती दिसून येते. तिच्या प्रत्येक चित्रात कल्पकतेचा प्रत्यय येतो. वास्तवदर्शी मांडणी ही तिच्या कलेची खास ओळख ठरत आहे. अल्पवयातच तिने आपल्या नैसर्गिक कलागुणांच्या बळावर आणि आदर्श विद्यार्थ्याप्रमाणे कलेची साधना, सातत्यपूर्ण सराव करून प्रावीण्य मिळवले आहे. म्हणूनच तिने अनेकांचे लक्ष वेधून घेतले असून, तिचा प्रवास प्रेरणादायी आहे. तिच्या समवयस्कांनी आणि सर्वांनीच तिचा आदर्श नक्कीच घेण्यासारखा आहे. अमृत महाराष्ट्रतर्फे गायत्रीला शुभेच्छा!
संपर्क : 8983618963
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment