यवतमाळ येथील विद्यार्थी श्रीहरी श्याम दातार यांनी विकसित केलेल्या "Wireless AC Current Detector (Non-Contact AC Voltage Tester)" या अभिनव उपकरणाला पेटंट प्राप्त झाले आहे.
यवतमाळ येथील विद्यार्थी श्रीहरी श्याम दातार यांनी विकसित केलेल्या "Wireless AC Current Detector (Non-Contact AC Voltage Tester)" या अभिनव उपकरणाला पेटंट प्राप्त झाले आहे. या संशोधनामुळे विद्युत सुरक्षेच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान मिळणार असून, याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे. हे उपकरण कोणत्याही विद्युत तारेला प्रत्यक्ष स्पर्श न करता त्या ठिकाणी एसी (Alternating Current) विद्युत प्रवाह आहे की नाही, हे सुरक्षितपणे ओळखते. पेन सारखे -Pen - like अथवा क्लॅम्प-प्रकारातील हे उपकरण विद्युत लाइन "लाईव्ह" आहे की नाही, याची जलद व अचूक माहिती देते. त्यामुळे वीजतंत्रज्ञ, अभियंते, विद्युत कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिकांना विद्युत धक्क्यांपासून संरक्षण मिळण्यास मदत होणार आहे. पेटंट प्राप्त झाल्याबद्दल अमृत जिल्हा कार्यालय, यवतमाळ यांच्या तर्फे श्रीहरी श्याम दातार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या संशोधनाचे कौतुक करत हे यश यवतमाळ जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असल्याचे सांगितले. तसेच भविष्यातही त्यांच्या संशोधनातून समाजोपयोगी व नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. श्रीहरी श्याम दातार यांना मिळालेले हे पेटंट त्यांच्या संशोधनाची अधिकृत दखल असून, यामुळे यवतमाळच्या संशोधन क्षेत्राला नवी ओळख मिळाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : परिक्षीत कमलकिशोर शर्मा जिल्हा व्यवस्थापक ९११२२२७६३३ जिल्हा कार्यालय पत्ता : स्वामी समर्थ विहार, पहिला माळा, फ्लॅट क्रमांक ए-१, अवधूतवाडी, तिवारी चौक, यवतमाळ - ४४५ ००१ ई-मेल : amrut.yavatmal.dm@gmail.com
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment