नाचनवेलमधील संजय पिंपळे म्हणजे शेतकरी आणि समाजासाठी प्रेरक व्यक्तिमत्त्व

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अमृत परिवार सर्वेक्षणावेळी घेण्यात आली भेट

नाचनवेलमधील संजय पिंपळे म्हणजे शेतकरी आणि समाजासाठी प्रेरक व्यक्तिमत्त्व मुख्य फोटो
नाचनवेलमधील संजय पिंपळे म्हणजे शेतकरी आणि समाजासाठी प्रेरक व्यक्तिमत्त्व अतिरिक्त फोटो

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे एप्रिल महिन्यात अमृत परिवार सर्वेक्षण करण्यात आले. अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, याकरिता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्या वेळी घेण्यात आलेल्या एका प्रेरक भेटीबद्दल...

अमृत परिवार सर्वेक्षण अभियानात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथील लाभार्थी संजय व्यंकटराव पिंपळे यांची भेट घेतली. शेती व्यवसायात त्यांनी केलेल्या यशस्वी वाटचालीबद्दल या भेटीत जाणून घेतले.

नाचनवेल गावात ब्राह्मण समाजाची २५ घरे आहेत. संजय पिंपळे हे शेती व्यवसाय करतात. त्यांची दोन्ही मुले शहरात नोकरी करत असून, ते व त्यांची पत्नी गावात राहून शेतीची जबाबदारी सांभाळतात. गेली २५ वर्षे ते ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करत असून, त्यांनी पाच वर्षे गावाच्या उपसरपंचपदाची जबाबदारीही सांभाळली आहे.

अमृत परिवार सर्वेक्षणाच्या गेलो असताना 'अमृत संस्थेच्या माध्यमातून शासनाच्या योजना खरेच समाजापर्यंत पोहोचतात का,' अशी विचारणा श्री. पिंपळे यांनी माझ्याकडे केली. मी अमृत संस्थेच्या माध्यमातून लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांच्या बातम्या व व्हिडिओ उत्तरादाखल त्यांना दाखवले. ही माहिती पाहून श्री. पिंपळे यांनी समाधान व्यक्त केले. तसेच अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

यानंतर मी श्री. पिंपळे यांच्या शेताला भेट दिली. त्यांनी शेतात पाणी साठवण्यासाठी शेततळे तयार केले आहे. एक एकरमध्ये त्यांनी पपईची लागवड केली असून, त्यांना अडीच लाख रुपये खर्च आला. त्यातून त्यांना साडेबारा लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यांनी २० गुंठे क्षेत्रावर फुलशेती आणि २० गुंठे क्षेत्रावर वाल लागवड केली आहे. त्यांच्या शेतावर दहा महिलांना कायमस्वरूपी रोजगारही मिळाला आहे.

विशेष म्हणजे श्री. पिंपळे यांनी धारेश्वर महादेव संस्थानसाठी एक एकर जागा दान दिली आहे. येथे उभारलेल्या मंगल कार्यालयात विविध समाजातील विवाह आणि सामाजिक कार्यक्रम होतात. शेतीसोबत सामाजिक कार्यातही सक्रिय असलेले संजय व्यंकटराव पिंपळे हे परिसरातील शेतकरी आणि समाजासाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहेत.

योगेश भास्करराव रोडे

छत्रपती संभाजीनगर जिल्हा उपव्यवस्थापक

Publisher: योगेश रोडे News publisher name | Date: 07-05-2026 News publication date | Time: 11:45 PM News publication time | Views: 1,053 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: योगेश रोडे News publisher name | Date: 07-05-2026 News publication date | Time: 11:45 PM News publication time | Views: 1,053 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement