संत नामदेव महाराजांचा अभंग
विटेवरी उभा दीनांचा कैवारी ।
भेटाया उभारी दोन्ही बाह्या ।।१।।
गुण दोष त्याचे न पाहेचि डोळां ।
भेटे वेळोवेळां केशिराज ।।२।।
ऐसा दयावंत घेत समाचार ।
लहान आणि थोर सांभाळितो ।।३।।
सर्वांलागीं देतो समान दरुशन ।
उभा तो आपण सम पायी ।।४।।
नामा म्हणे तया संतांची आवडी ।
भेटावया कडाडी उभाची असे ।।५।।
- संत नामदेव महाराज
(संकलक : प्रसाद वैद्य, रत्नागिरी)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment