संत नामदेव महाराजांचा अभंग
चक्रवाक पक्षी वियोगें बाहाती । झालें मजप्रती तैसे आतां ।।।१।। चुकलिया माय बाळकें रडती । झालें मजप्रती तैसे आतां ।।।२।। वत्स न देखतां गाई हुंबरती । झालें मजप्रती तैसे आतां ।।।३।। जीवनावेगळे मत्स्य तळमळती । झालें मजप्रती तैसे आतां ।।।४।। नामा म्हणे मज ऐसें वाटे चित्तीं । करीतसे खंती फार तुझी ।।।५।। - संत नामदेव महाराज (संकलक : प्रसाद वैद्य, रत्नागिरी)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment