घर्षण केल्याशिवाय रत्न उजळत नाही

स्वामी विवेकानंद यांचा विचार

घर्षण केल्याशिवाय रत्न उजळत नाही मुख्य फोटो
मुख्य फोटो

घर्षण केल्याशिवाय रत्न उजळत नाही. त्याचप्रमाणे सातत्याने प्रयत्न केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही.

- स्वामी विवेकानंद

घर्षण केल्याशिवाय रत्न उजळत नाही. ही उक्ती जीवनाचे गूढ सांगते. खाणीत जेव्हा एखादा हिरा सापडतो, तेव्हा तो अगदी एखाद्या गारगोटीसारखाच दिसतो. परंतु जेव्हा घासून त्यास पैलू पाडले जातात, तेव्हा त्याला तेज प्राप्त होते. त्यांचे मूल्य वाढते. तसेच माणसाच्या गुणांना धार येते ती निरंतर प्रयत्नांमुळे. प्रयत्नांशिवाय प्रतिभा सुप्तच राहते.

अपयश, अडथळे आणि चुका हेच घडवणारे शिक्षक असतात. घर्षणात वेदना असतात; पण त्यातूनच कौशल्य जन्माला येते. शिस्त, संयम आणि मेहनत या यशाच्या पायऱ्या आहेत. दररोज केलेला थोडासा प्रयत्न मोठे परिवर्तन घडवतो. सातत्य तुटले, की प्रगतीची गती मंदावते. म्हणूनच ध्येय स्पष्ट ठेवून मार्गावर टिकून राहणे आवश्यक आहे. यश हे अचानक मिळणारे फळ नसते. ते दीर्घ काळच्या साधनेचे आणि आत्मविश्वासाचे फलित असते. परिश्रमांची चमकच व्यक्तिमत्त्व उजळवते, म्हणून सातत्याने प्रयत्न करणे हाच कुशलतेचा खरा मार्ग आहे. स्वामी विवेकानंद यांनीसुद्धा सातत्याने प्रयत्न केले, ध्यान केले तेव्हाच त्यांना त्यांच्या जीवनाचे ध्येय त्यांना सापडले. म्हणूनच स्वामी विवेकानंद म्हणतात - घर्षण केल्याशिवाय रत्न उजळत नाही. त्याचप्रमाणे सातत्याने प्रयत्न केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही.


Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 06-02-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 4 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 06-02-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 4 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement