प्रयत्नांती परमेश्वर

बोधकथा -५१

प्रयत्नांती परमेश्वर मुख्य फोटो
मुख्य फोटो

जो माणूस जसा जन्माला आला आहे, त्याबाबतीत कधीच निराश नसतो तो खरा मनुष्य असतो. कारण माणूस प्रयत्नाने स्वतःला घडवू शकतो. आपण आदिमानवापासून प्रगती करत इथपर्यंत पोहोचलो आहोत, मग आपण प्रयत्न करून एखादे उद्दिष्ट साध्य करू शकत नाही का?

आईन्स्टाईन हा प्रसिद्ध शास्त्रज्ञ आपल्या सर्वांना माहित आहे. विद्यार्थीदशेत हा आईन्स्टाईन मंदबुद्धीचा होता. अनेकदा शिक्षक त्याला म्हणत की, तू नावाप्रमाणेच दगड आहेस. परंतु आईन्स्टाईनने आपल्या प्रयत्नांच्या साहाय्याने स्वतःला घडवले. त्याने स्वतःच्या जीवनाचे गंभीरपणे चिंतन केले. अविश्रांत परिश्रम करून त्याने ‘सापेक्षवादाचा सिद्धांत’ शोधून काढला. बालपणी दगड म्हणून हिणवला जाणारा आईन्स्टाईन महान शास्त्रज्ञांपैकी एक झाला. म्हणूनच समर्थ म्हणतात, माणसाने न्यूनगंड काढून टाकावा आणि प्रत्यक्ष व्यवहार करीत असताना, आपल्याकडील एक एक उणीव नाहीशी करून चांगल्या गोष्टी आत्मसात कराव्यात. आपल्याला हे जमणारच नाही किंवा आपल्यात काहीच सुधारणा होणार नाही, असा हीन मनोगंड मनात ठेवल्यास माणसात कधीच सुधारणा होणार नाही. आपल्या शब्दकोशात ‘अशक्य’ हा शब्दच नसावा. फक्त गरज आहे ती आपण सतत शिकत राहण्याची.

संदर्भ- संस्कारांचे मोती

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 12-06-2026 News publication date | Time: 01:10 PM News publication time | Views: 12 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 12-06-2026 News publication date | Time: 01:10 PM News publication time | Views: 12 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement