सकारात्मक दृष्टिकोन

बोधकथा २४

सकारात्मक दृष्टिकोन मुख्य फोटो
सकारात्मक दृष्टिकोन अतिरिक्त फोटो

एक तरुण स्त्री डायनिंग टेबलापाशी बसून होती. ती चिंतेत होती. मार्च एंड जवळ आल्यामुळे इन्कम टॅक्सबद्दल नियोजन करावे लागणार होते. घरातील सर्व कामे तर करायचीच होती. शिवाय होळीच्या निमित्ताने बरेच पाहुणे जेवायला येणार होते. या सगळ्या गोष्टींमुळे ती त्रस्त झाली होती.

जवळच तिची १० वर्षांची मुलगी आपल्या वहीत काहीतरी लिहीत होती. तिने मुलीला विचारले, 'काय लिहितेयस?' मुलगी म्हणाली, 'आज बाईंनी गृहपाठ दिलाय, त्याचा विषय आहे निगेटिव्ह थँक्सगिव्हिंग. त्यात अशा गोष्टींवर निबंध लिहायचा आहे, की ज्या आपल्याला सुरुवातीला आवडत नाहीत, पण नंतर आवडायला लागतात.'

आईने आश्चर्य व्यक्त करून आपल्या मुलीने काय लिहिले आहे ते पाहण्यासाठी वही घेतली. मुलीने लिहिले होते, 'मी माझ्या वार्षिक परीक्षेला धन्यवाद देते. कारण त्यानंतर उन्हाळी सुट्टी चालू होते. मी कडू आणि खराब चवीच्या औषधांना धन्यवाद देते. कारण ती औषधे घेतल्यावरच माझी तब्येत चांगली होते. मी गजराच्या घड्याळाला धन्यवाद देते. कारण पहाटे पहाटे तेच मला झोपेतून उठवून अभ्यासाला लावत असते.'

वाचता वाचता आईच्या मनात विचार आला, की 'अरे माझ्याकडेही अशा अनेक गोष्टी आहेतच, की ज्यांच्यासाठी मी आभार व्यक्त करू शकते.' विचार करता करता खूप बाबी समोर आल्या, 'इन्कम टॅक्स भरावा लागतो, याचाच अर्थ सुदैवाने माझ्याकडे चांगल्या पगाराची नोकरी आहे. घरी भरपूर काम करावे लागते, म्हणजेच माझ्याकडे एक घर अर्थात एक हक्काचे आश्रयस्थान आहे. सणासुदीला मला खूप माणसांसाठी जेवण बनवावे लागते. म्हणजेच माझ्याकडे भरपूर नातेवाईक आहेत आणि ते माझ्या सुख-दुःखाचे साथीदार आहेत.'

बोध : प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन महत्त्वाचा. आपणही असाच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस सोनेरी बनवू या.

(संकलित)

Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 05-02-2026 News publication date | Time: 11:22 AM News publication time | Views: 77 Number of times this news has been viewed | District: ratnagiri Related district of the news
Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 05-02-2026 News publication date | Time: 11:22 AM News publication time | Views: 77 Number of times this news has been viewed | District: ratnagiri Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words