संत तुकारामांचा अभंग
पापिया चांडाळा हरिकथा नावडे ।
विषयी आवडे गाणें त्याला ।।१।।
ब्राह्मणा दक्षिणा देतां रडे रुका ।
विषयालागीं फुका लुटी धन ।।२।।
वीतभरि लंगोटी नेदी अतिताला ।
भोरप्यासी शाला वांटीतसे ।।३।।
तुका म्हणे त्याच्या थुंका तोंडावरी ।
जातो यमपुरी भोगावया ।।४।।
- संत तुकाराम महाराज
(संकलक : प्रसाद वैद्य, रत्नागिरी)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment