तोत्तोचान

पुस्तकाचा परिचय...

तोत्तोचान  मुख्य फोटो
मुख्य फोटो

तोत्तोचान (स्वतः लेखिका) ही एक चंचल, शाळेतून काढून टाकलेली, शिक्षकांसाठी खोडसाळ पण तरीही कुतूहलपूर्ण, उत्तम सामाजिक जाण असलेली प्रेमळ, आनंदी, धडपडी आणि निरागस चिमुरडी आहे. तिचं लहानपणीचं भावविश्‍व, तिचे पालक, लाडकी तोमोई शाळा आणि तिचे अनोखे मुख्याध्यापक कोबायाशी, त्यांचे शिक्षणविषयक नावीन्यपूर्ण उपक्रम, तळमळ, मुलांवरचा अतीव विश्‍वास... हे सारं आणि अजून खूप काही सांगणारं पुस्तक म्हणजे तोत्तोचान.

कोबायाशींच्या मते, सगळी मुलं स्वभावतः चांगलीच असतात. तो चांगुलपणा रुजवणं आणि मुलांची वैयक्तिकता टिकवणं महत्त्वाचं असतं. स्वाभाविक व नैसर्गिक वाढीसाठी मुलांना शिक्षणाबरोबरच क्रीडा, संगीत निसर्ग, चित्रकला यांच्या जोडीला मुलांवर अथांग प्रेम करणारे पालक व शिक्षक मिळणं फार गरजेचं आहे. शाळांचा अभ्यासक्रम पाठ्यपुस्तकमुक्त असावा, शिक्षण हसत-खेळत चालावं, असं त्यांना वाटे. तोमोई शाळेतले अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम, खेळ, गमती आपल्या शिक्षणपद्धतीत कदाचित अति आदर्शवादी वाटतील; पण तरीही शिक्षणासंबंधी प्रेम, आस्था असणाऱ्या प्रत्येकाने वाचलंच पाहिजे, असं हे पुस्तक! हे पुस्तक तसे तर शाळकरी मुलांनी वाचावं असं आहे, पण हे पुस्तक वाचत असताना मोठ्या माणसांनासुद्धा जीवनाविषयी अनेक गोष्टी नव्याने शिकायला मिळतात. आपण मोठेसुद्धा अनेक गोष्टीत दुसऱ्याशी तुलना करतो, आपल्यामधील कौशल्ये, गुण-दोष यांचा विचार न करता जग धावेल तसे धावत असतो आणि हे सगळे कळत-नकळत मुलांवर बिंबवत असतो. त्यामुळे मुलांनासुद्धा शिक्षण, परीक्षा, मार्क्स मिळवणे ही शिक्षाच वाटत असते. खरंतर शिकणे ही आनंद देणारी प्रक्रिया असावी. ती आनंददायी प्रक्रिया कशी होऊ शकते, हे सांगणारे पुस्तक म्हणजे तोत्तोचान.

पुढची पिढी मनाने निरोगी व्हावी अशी इच्छा असणारा प्रत्येक शिक्षक,पालक आणि विद्यार्थी यांनी आर्वजून पुन्हा पुन्हा वाचायला हवे, असे पुस्तक. 

पुस्तकाचे नाव - तोत्तोचान

मूळ लेखिका - तेत्सुको कुरोयानागी

अनुवाद - चेतना सरदेशमुख-गोसावी

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 05-02-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 20 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 05-02-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 20 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement