संत जनाबाईंचा अभंग
भक्तीसाठी याति नाहीं ।
नाहीं तयासी ते सोई॥१॥
रोहिदास तो चांभार ।
त्याचा करी कारभार॥२॥
जो कां भक्त यातिहीन ।
देव करी त्याचा मान ॥३॥
त्यासी भक्ताचा आधार ।
वाट पाहे निरंतर ॥४॥
जनी म्हणे भक्तासाठी ।
विठो सदा गोप्य लोटी ॥५॥
- संत जनाबाई
(संकलक : प्रसाद वैद्य, रत्नागिरी)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment