संत तुकाराम महाराजांचा अभंग
करितों कवित्व म्हणाल हें कोणी । नव्हे माझी वाणी पदरींची ।१। माझिये युतीचा नव्हे हा प्रकार । मज विश्वंभर बोलवितो ।२। काय मी पामर जाणें अर्थभेद । वदवी गोविंद तेंचि वदें ।३। निमित्त मापासि बैसविलों आहें । मी तो कांहीं नव्हे स्वामिसत्ता ।४। तुका म्हणे आहे पाईकची खरा । वागवितों मुद्रा नामाची हे ।५। - संत तुकाराम महाराज (संकलक : प्रसाद वैद्य, रत्नागिरी)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment